कोल्हापूर

विद्युत बस बारगळली

CD

विद्युत बस फोटो
--
विद्युत बस ठेका रद्द, चार्जिंग सेंटर बिनकामी
४ हजार पैकी २२० बसचा पुरवठा ः खासगी कंपनीकडून नियोजन फसले
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः प्रदूषण टाळणाऱ्या विद्युत बस एसटी महामंडळाला पुरविण्यात खासगी ठेकेदार कंपनीला अपयश आल्याने एसटी महामंडळाने बस पुरवठ्याचा ठेकाच रद्द केला आहे. एसटी महामंडळाने कोल्हापूरसह राज्यात १०० कोटी खर्चून उभारलेल्या चार्जिंग सेंटरचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाने चार्जिंग सेंटर खासगी गाड्या चार्जिंग करण्यासाठी देऊन एसटीला महसूल वाढीचा पर्याय वापरावा लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या इंधन खर्चाची बचत व्हावी, प्रदूषण कमी व्हावे, जास्त प्रवाशांची वाहतूक व्हावी, असे विविध लाभ विचारात घेऊन एसटी महामंडळाने विद्युत बस घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासगी कंपनीला जून २०२३ ला ठेका दिला. कंपनीने एसटीला जवळपास २२० विद्युत बस दिल्या. त्यांतील कोल्हापुरात सहा बस कोल्हापूर-पुणे मार्गावर सेवा देतात. दोन बस मार्गस्थ असताना दोन बस कोल्हापुरात चार्जिंगला असतात. या बस आलिशान असून आरामदायी आसन, फुल्ली एअर सस्पेंशन आदी सुविधा आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एसटी महामंडळाने ४ हजार विद्युत बस घेण्याचा ठेका खासगी कंपनीला दिला; मात्र प्रत्यक्ष वर्षाला १ हजार २८६ बस पुरवणे गरजेचे होते. तरीही कंपनीने आजवर फक्त २२० बस पुरवल्या. कराराचा कंपनीने भंग केला, असे असताना कंपनीला बिले देण्यासाठी प्रधान सचिवांकडून एसटी महामंडळावर दबाव टाकला गेला. त्यानंतर कंपनीला बस पुरवण्यासाठी मुदतवाढ दिली तरीही कंपनीने बस अपेक्षित अशा पुरवल्या नाहीत. यावर महाराष्ट्र एसटी काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांनी परिवहनमंत्र्यांना आक्षेपाचे पत्र दिले. त्यानंतर ठेकेदार कंपनी विद्युत बस महामंडळास पुरवू शकत नसल्याने परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनुसार विद्युत बसचा ठेका रद्द झाला. कोल्हापूरसह राज्यातील ८० एसटी आगारात उभारलेल्या चार्जिंग सेंटरचा १०० कोटींचा खर्च वाया गेला. एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात नव्या विद्युत बस पुरवू शकणारी दुसरी ठेकेदार कंपनी मिळणेही मुश्कील आहे.
--
कोट
एसटी महामंडळ व खासगी कंपनीच्या करारानुसार वर्षभरात १२८० विद्युत बस महामंडळाला देणे बंधनकारक असताना प्रत्यक्ष २२० विद्युत बस पुरविल्या. करारातील नियोजित वेळ कंपनी पाळेल म्हणून एसटी महामंडळाने १०० कोटी रुपये खर्चून चार्जिंग सेंटर उभारली. त्यासाठी राज्य शासनाने निधी दिला; मात्र प्रत्यक्ष विद्युत बसच पुरवल्या नाहीत. त्यामुळे चार्जिंग सेंटरचा उपयोग नसल्याने खर्च वाया गेला. यावर महाराष्ट्र एसटी काँग्रेसने आक्षेप घेतला. त्यानंतर विद्युत बस पुरवठ्याचा ठेका परिवहनमंत्र्यांनी रद्द केला.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी काँग्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

SCROLL FOR NEXT