कोल्हापूर

मास्क वाटप

CD

व्हीआयपी इंडस्ट्रीजकडून
सीपीआरला ३० हजार मास्क

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३० ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयास व्हीआयपी इंडस्ट्रीज (मुंबई) कंपनीने ३० हजार प्रोटेक्टेड मास्क देणगी म्हणून दिले आहे. असे मास्क १०० टक्के विषाणू प्रतिबंधक आहेत. यामुळे कोरोनासह इतर संसर्गापासून बचाव होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे व अधिक्षक डॉ. राजेंद्र मदने यांनी मास्क स्वीकारले. सोमवार (ता. १) पासून सीपीआरच्या रुग्णांना मोफत मास्क देण्यात येतील.
कार्यक्रमास व्हीआयपी इंडस्ट्रीज मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक अक्षय परीकर, समाजसेवा अधीक्षक, जी. टी हॉस्पिटल, मुंबईचे विजय गायकवाड यांचे सौजन्य लाभले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची मदत होणार आहे. मास्क देणगीमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या रुग्णसेवेसह व समाजहित आधिक चांगल्या प्रकारे साधले जाईल.’’ यावेळी विजय गायकवाड यांनी, राज्यभर मास्क देणगीदाखल देण्यात येतील. सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचे सांगितले. परीकर यांनी रुग्णालयासाठी आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले. सोमवारपासून केस पेपर कक्षातून मास्कचे मोफत वाटप होईल. आठवडाभर मास्क वापरण्याविषयी जनजागृती केली जाईल. यावेळी बालरोगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शिशिर मिरगुंडे, समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख शशिकांत राऊळ, समाजसेवा अधीक्षक बाजीराव आपटे, अजित भास्कर उपस्थित होते. रोहीत लोखंडे यांनी सूत्रसंचलन केले. महेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT