67302
घाटकरवाडी (ता. आजरा) ः डॉ. विलास बर्डेकर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना श्रीहरी पाटील व त्यांच्या पत्नी जिजाबाई. या वेळी सलीम मुल्ला, गंगाचंद्र मंचचे अध्यक्ष दत्ता पाटील व मान्यवर.
--
गंगाचंद्र काव्य पुरस्काराचे
घाटकरवाडीत वितरण
आजरा, ता. ३१ ः घाटकरवाडी (ता. आजरा) येथे गंगाचंद्र साहित्य कला सेवा मंचतर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण झाले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर अध्यक्षस्थानी होते. साहित्यिक सलीम मुल्ला उपस्थित होते. गंगा चंद्रमंचचे अध्यक्ष दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. शालेय मुलांनी कविता वाचन केले. साहित्यिक दशरथ माडभगत यांच्या ‘प्रपंच’ कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. सलीम मुल्ला, दशरथ माडभगत यांना ‘साहित्यव्रती’ पुरस्काराने गौरविले. श्रीहरी काव्य पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील, जिजाई काव्य पुरस्कार प्राचार्य रेखा दीक्षित, सुवर्ण साक्षी पुरस्कार प्रा. भारती पाटील व
गंगाचंद्र विशेष काव्य पुरस्कार स्नेहल पंडित यांच्या काव्यसंग्रहांना देऊन गौरविले. वयोवृध्द श्रीहरी पाटील यांनी राधेकृष्ण तमाशातील गण व राजा हरिश्चंद्रचा वग गायिला. यावेळी रामा रघुनाथ पाटील, विठ्ठल पाटील, आजरा कारखाना संचालक गोविंद पाटील, निवृत्ती अडकूरकर, रमेश पवार, लक्ष्मण अडकूरकर, नंदाताई पताडे आदी उपस्थित होते. गंगाचंद्रच्या सचिव वैष्णवी पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.