मोफत सौर योजनेचे
महिन्यात ३० हजारांचे बिल
सेवा निवृत्ताला झटका ः महावितरणचा कारभार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः दरमहा वीज बिल भरण्यातून सुटका व्हावी, सौरऊर्जेची मोफत वीज वापरा, अशी जाहिरात घेऊन सौरऊर्जा प्रकल्प घरावर बसवला,
मोफत वीज मिळणार म्हणून आनंदात असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पहिल्याच महिन्यात महावितरणने तब्बल ३० हजारांचे बिल दिले.
यावर कहर असा की महावितरणला विचारणा केल्यावर ‘बघू’ असा आशयाचे उत्तर मिळाले.
राजारामपुरी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी दत्ता सुतार यांनी दोन महिने महावितरण कंपनीने एका राष्ट्रीय बॅंकेकडे सौरऊर्जा यंत्रणा बसविणाऱ्या कंपनीकडे पाठपुरावा करून सूर्यघर योजनेचे पॅनेल टेरेसवर बसवून घेतले. विजेचे बिल शून्य येणार असा समज झाला. ७८ हजारांची सबसिडी त्यांच्या खात्यात जमा झाली. महिना झाला महावितरणच्या बिलाची रक्कम ३० हजार रुपये आहे. महावितरणच्या पांजरपोळ कार्यालयाशी त्यांनी जाऊन संपर्क केला, त्यावर कंपनी अभियंत्यांनी लेखी तक्रार द्या’ तेही दिले, त्यावर उत्तर आले. ‘बघू’, महावितरणची थकबाकी श्री. सुतार यांच्या नावे नाही. सुतार यांच्याकडून यापूर्वी विजेची घरगुती साधणे होती, त्याच साधनांचा वापर आहे. या साधनांसाठी एका दिवसात एक हजारांची वीज वापरली, असेही नाही. असे असताना महिन्याचे बिल ३० हजार आले आहे. योजनेच्या अंमलबजवणीविषयी शंका निर्माण होत आहेत.
महावितरणची वीज बिले चुकीची येतात. त्यावर विचारणा केली की, पहिल्यांदा वीज बिल भरा, नंतर दुरुस्ती करू, जादा रक्कम पुढच्या बिलात वजा करू’ अशी उत्तरे महावितरणकडून दिली जातात. त्यानंतर वीज ग्राहकाने पाठपुरावा केला, मनस्ताप सहन केल्यानंतर बिलात दुरुस्ती होते. असे का? याबाबत अधिकाऱ्यांना विचारले, की ऑनलाईन तक्रार करा’ असे सांगण्यात येते. असा मनस्ताप ग्राहकांना सोसावा लागतो. याबाबत सकाळने महावितरण शहर अभियंत्यांशी संपर्क साधून याविषयी विचारले असता, त्यांनी संबंधित विभागाकडून माहिती घेऊन सोमवारपर्यंत बिल दुरुस्तीबाबत कळवले जाईल, असे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.