इचलकरंजी महापालिका फोटो
उपायुक्तपदी मर्ढेकर,
सहाय्यक आयुक्तपदी जिरगे
इचलकरंजी ः येथील महापालिकेकडे दोन नव्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. उपायुक्तपदी राहुल मर्ढेकर, तर सहाय्यक आयुक्तपदी संतोष जिरगे यांच्या नियुक्तीचा समावेश आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचा आदेश दिला आहे. यातील सध्या सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले मर्ढेकर हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. जिरगे हे मालवण नगरपरिषद (जि. सिंधुदुर्ग) येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते. राज्यातील एकूण २९ मुख्याधिकारी पदावरील प्रथम व द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश दिले आहेत. त्यात या दोन अधिकाऱ्यांची इचलकरंजी महापालिकेकडे नियुक्ती झाली आहे. यामध्ये आता महापालिकेकडे तीन उपायुक्त असणार आहेत. सहाय्यक आयुक्तांच्या संख्येतही वाढ होणार आहे.
पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या
इचलकरंजी ः इचलकरंजी महापालिकेकडे महत्त्वाच्या पदावर कार्यरत पाच अधिकाऱ्यांची अन्य नगरपरिषदांकडे बदली झाली आहे. त्यांचा महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा संवर्ग (गट- क) यात समावेश होता. सध्या त्यांच्याकडे महापालिकेत विविध विभागांची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या सेवेचा दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे त्यांच्या बदलीचे आदेश नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी बदलीचे आदेश दिले आहेत. बदली झालेले अधिकारी व बदलीचे ठिकाण असे ः अरिफा नूलकर (रत्नागिरी), प्रियांका बनसोडे (शिराळा), स्वप्नील बुचडे (कऱ्हाड), शीतल पाटील (कुळगाव, बदलापूर, जि. ठाणे), सीमा धुमाळ (पलूस). रिक्त पदांवर अद्याप नवीन नियुक्तीचे आदेश निघालेले नाहीत.
वारसा हक्काने
२५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
इचलकरंजी ः महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या २५ पात्र वारसांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार यांच्याहस्ते नियुक्तीचे आदेश देण्यात आले. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे शहराची सेवा करावी, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.