निम्म्या शहराचा
उद्या पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर, ता. ३१ ः चंबुखडी टाकीवर मॅनिफोल्ड बसविण्याचे कामकाज हाती घेण्यात येणार असल्याने सोमवारी (ता. २) पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे होणारा पाणीपुरवठा बंद राहील, त्यामुळे निम्म्या शहरात म्हणजेच ए, बी, सी, डी वॉर्डात पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी (ता. ३) या भागात होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. यात ए, बी, वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरी अंतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ,चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी डी वॉर्ड दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब, ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहूपुरी ५, ६, ७ व ८ वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक आदी परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.