कोल्हापूर

गड- आठवडा बाजार

CD

67463
गडहिंग्लज : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजारात घरगुती बियाणांची आवक सुरू झाली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


घरगुती बियाण्‍यांचा भरला बाजार
पावसामुळे पालेभाज्यांचे भाव वधारले : तोतापुरी आंब्याची आवक; कांदा वाढला
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजारात घरगुती बियाण्‍यांची आवक सुरू झाली आहे. मागणीमुळे दर तेजीत आहेत. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पाऊसामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी, भाव २०  ते ३० टक्क्यांनी वधारले आहेत. लसूण, बटाट्याचे दर स्थिर असून कांदा दरात किरकोळ वाढ झाली आहे. फळबाजारात स्थानिक हापूस आंब्याची आवक कमी होऊन कर्नाटकातून तोतापुरी वाढला आहे. जनावरांच्या बाजारात म्हशींना मागणी वाढली आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतक-यांना खरीप हंगामाच्या तयारीला वेळच अपुरा पडला. परिणामी, शेत तयार करण्यासह बियाण्‍यांची जोडणी करण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील आठवडा बाजारात नेहरू चौकालगत तेलवेकर गल्लीत आज घरगुती बियाण्‍यांची आवक सुरू झाली. सकाळपासून शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे घेऊन विक्रीसाठी हजेरी लावली. शेंगदाणे, सोयाबीन, भात, बटाटे, कांदे, मिरचीसह विविध फळभाज्यांची बियाण्‍यांची आवक होती. पारंपरिक मापट्याने त्याची विक्री सुरू होती. विश्वाससार्हतेमुळे या बियाण्‍यांना शेतकर-यांची अधिक मागणी असते. त्यामुळे दरही तेजीत असतात. पेरणी होईपर्यंत महिनाभर प्रत्येक रविवारी या बियाण्‍यांचा बाजार भरतो.
पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे मोठे नुकसान झाल्याने भाजी मंडईत आवक घटली आहे. साहजिकच मागणी कायम असल्याने भाव वधारल्याचे विक्रेते स्वप्नील डोमणे यांनी माहिती दिली. प्लॉवर, वांगी, दोडका, भेंडी, ढब्बू यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी वधारले आहेत. सरासरी ८० रुपये किलो अशी विक्री सुरू होती. बिन्स, गवारीच्या दराची सेंच्युरी कायम आहे. कांद्याच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी दर वाढल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. १५ ते ३० रुपये किलो असा दर आहे. बटाटा, लसणाचे दर स्थिर असून अनुक्रमे ३५ ते ४० आणि ६० ते १६० रुपये किलो असा दर आहे. स्थानिक हापूस आंब्याची आवक घटली असून तोतापुरीची अधिक आहे. नगारा १० ते २० रुपयांपर्यंत दर आहे. लोणच्याच्या आंब्याची आवक तुरळक आहे. शेकडा २०० ते ३०० रुपये असा आकारानुसार दर आहे. जनावरांच्या बाजारात म्हशींना मागणी असून ८० हून अधिक आवक नोंदली. ४५ ते ८५ हजारांपर्यंत दर होते.  

चौकट...
फणसाची आवक अधिक
आजरा, चंदगड तालुक्यातून फणसाची आवक वाढली आहे. मोक्याच्या ठिकाणी ढीग रचून व्यापारी विक्री करीत आहेत. आकारानुसार १०० ते २०० रुपयांपर्यंत दर आहेत. काहीं विक्रेते फणस कापून गर देखील विकत आहेत. दहाला दोन तर पंचवीस सात असा दर होता. रानमेवा करवंदाची आवक बंद झाली आहे. जांभळाची आवक कमी झाल्याने आणखी दर वधारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank of Baroda: 'बँक ऑफ बडोदा'चा डेटा कसा 'लीक' झाला? ग्राहकांना धोका आहे का? बँकेने दिलं अधिकृत स्पष्टीकरण

Virar Timber Smuggling: विरारमध्ये भाजीपाल्याच्या टेम्पोआडून खैर लाकडाची तस्करी उधळली; वन विभागाची पहाटे धाडसी कारवाई, मुद्देमाल जप्त

Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प

Bhima River Farmers: भिमा नदीत पाणी सोडूनही वीज नाही; संतप्त नदीकाठच्या शेतकऱ्यांची ‘आठ तास वीज नसेल तर पाणीही नको’ अशी सोशल मीडियातून हाक

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT