लोगो-- बिग स्टोरी
-------
१)फोटो १२ तालुक्यांचे नकाशे
२) सांडपाणी फोटो
३) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
----------
‘एसटीपी’ नावाला, सांडपाणी नदीला...
प्रदूषण नियंत्रणाचा केवळ दिखावा; प्रकल्प कुठे मंजूर, तर कुठे अडकले लालफितीत
लीड
निविदा नाही. वर्कऑर्डर नाही, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) तयार नाही, आहेत ते कार्यान्वित नाहीत. परिणामी जिल्ह्यातील सांडपाणी थेट नदी-नाल्यात मिसळत आहे. एकीकडे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न होत असल्याचा दिखावा केला जातो. दुसरीकडे मात्र प्रशासकीय पातळीवरील संथ गतीने काम सुरू आहे. प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रणाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे जिल्ह्यातील स्थितीवरून स्पष्ट होते.
‘स्वच्छ भारत मिशन’ या योजनेतून ६० टक्के केंद्र शासन आणि ४० टक्के राज्यशासन अशा निधीतून जिल्ह्यातील एसटीपी तयार करण्याचे नियोजन आहे.
पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावात एसटीपी आवश्यक आहे. जिल्ह्यात अशी १८१ गावे आहेत. त्यात १५९ ठिकाणच्या एसटीपीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ‘एसबीटी’ पद्धतीचे हे प्रकल्प आहेत. ३६ ठिकाणी वर्कऑर्डर दिली आहे. साधारण ४० लाख ते दीड कोटीपर्यंतच खर्च आहे. जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून याचे नियोजन केले जात आहे. उर्वरित सर्व प्रकल्प महिन्याभरात सुरू होतील, ज्यांचे काम सुरू आहे, ते पूर्ण होईल, अशी स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी दिली.
----
शहरातील स्थिती -
*पंचगंगा नदी प्रदूषण दृष्टिक्षेप
*पाणी उपसा - १५० एम.एल.डी
*प्रक्रिया होणारे सांडपाणी - ९४ एमएलडी
*थेट नदीत मिसळणारे सांडपाणी - ४० एमएलडी
*दुधाळी आणि कसबा बावडा येथे एसटीपी कार्यान्वित
*एसटीपी एसएससी बोर्ड आणि पाचगाव परिसरात प्रस्तावित
-----------------------------------------------------------------------------
गडहिंग्लज तालुका
एकही एसटीपी नाही;
सांडपाणी थेट नदीत
गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील एकही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित नाही. बहुतांश गावचे सांडपाणी हिरण्यकेशी नदीतच मिसळते. परिणामी पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरातील सांडपाण्यासाठी स्वतंत्र बंधारा असला तरी प्रक्रिया होत नाही. साठा अधिक झाला तर ते पाणीही नदीतच जाते. गडहिंग्लज नगरपालिकेने एसटीपीसाठी नदीवेस व बाळूमामा मंदिरजवळ अशी दोन ठिकाणे निश्चित केली आहेत. भुयारी गटारीसह एसटीपी असा संयुक्त प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पासाठी जागेची मोजणीही भूमिअभिलेख विभागाकडून झाली आहे. या मोजणीचा नकाशासह अहवाल यायचा आहे.
--
कोट
सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जागा संपादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. भुयारी गटारीसह एसटीपी प्रकल्पाचे नियोजन निश्चित केले आहे. त्याचा प्रकल्प आराखडा अंतिम टप्प्यात असून, साधारण १०० कोटींवर खर्च अपेक्षित आहे. निधीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठवला जाईल.
- देवानंद ढेकळे, मुख्याधिकारी गडहिंग्लज
----------------------------------------------------------------------------------------------
-कागल तालुका
एसटीपी १७ मंजूर;
एकच कार्यान्वित
कागल तालुक्यात एकूण ८३ गावे असून, १५ गावांसाठी एसटीपी मंजूर आहेत. त्यापैकी १४ गावांत निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, म्हाकवेत जागा निश्चित न झाल्यामुळे तिथे प्रक्रिया रखडली आहे. मुरगूड वगळता सद्यःस्थितीत एकही एसटीपी प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित नाही. कागल शहरात मंजूर असलेल्या नदीकडे जाणाऱ्या ओढ्यावर एसटीपीसाठी जागा मिळालेली नाही. पाझर तलाव परिसरात मंजूर झालेल्या एसटीपीचे लवकरच काम सुरू होणार आहे. मुरगूडमध्ये नव्याने साडेचार कोटींचा एमएलडी क्षमतेचा प्रकल्प मंजूर झाला आहे.
-
कोट
कागल तालुक्यात ज्या गावांची लोकसंख्या पाच हजारांपेक्षा अधिक आहे, तिथे नियमानुसार एसटीपी मंजूर केले आहेत. सध्या १४ गावांत निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. म्हाकवेतही लवकरच जागा उपलब्ध होऊन कामाला सुरुवात होईल.
- कुलदीप बोंगे, गटविकास अधिकारी, कागल.
--------------------------------------------------------------------
हातकणंगले तालुका
एसटीपी आहे, पण
सांडपाणी ओढ्यात
-
हातकणंगले तालुक्यात ६२ गावांचा समावेश आहे. यापैकी केवळ इचलकरंजी महापालिका क्षेत्रातच सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित आहे. हातकणंगले, पेठवडगाव आणि हुपरी या नगरपंचायत क्षेत्रात सांडपाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. हातकणंगले नगरपंचायत क्षेत्रांत सध्या एकूण o.६ एमएलडी सांडपाणी जमा होते, मात्र ते वाहून नेण्यासाठी भुयारी गटर योजना नसल्यामुळे सांडपाणी ओढ्यात मिसळते. नव्याने हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांसह जागा आवश्यक आहे. वडगाव व हुपरीसाठीही भुयारी गटार योजना राबवणे गरजेचे आहे. दोन्ही ठिकाणचा सांडपाणी प्रकल्प मंजुरीसाठी पाठवला आहे.
--
कोट
सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सात ते आठ कोटींची आवश्यकता आहे. सुरुवातीला ओढ्यात मिसळणारे सांडपाणी थांबवून त्याला लागूनच दुसरी पाईपलाईन तयार करून त्याद्वारे सांडपाणी संबंधित जागेत सोडले जाईल. पुढील दोन महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागेल.
- विशाल पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक, हातकणंगले.
-------------------------------------------------------------------
चंदगड तालुका
--
१५० पैकी केवळ ५ गावांत
पाणी शुध्दीकरण प्रकल्प
-
काही गावांनी जंगलातून सायफन पध्दतीने गावात टाकी बांधून पाण्याची सोय केली. त्यानंतरच्या टप्प्यात नळाद्वारे पाणी वितरण होऊ लागले. अलीकडे पाण्याचे स्त्रोतच अशुध्द बनल्याने पाणी शुध्दीकरण प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. आर्थिक खर्च पेलवत नसल्याने अनेक ग्रामपंचायतींनी पाठ फिरवली आहे. सुमारे १५० गावांच्या तालुक्यात केवळ चंदगड, कोवाड, माणगाव, राजगोळी, शिनोळी या पाच गावांतून शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या योजनांत बेळेभाट व इसापूर या गावांसाठी शुध्दीकरण प्रकल्प नियोजित आहे.
--------
अनेक योजना या झऱ्याच्या पाण्यावर आधारित आहेत. अनेक योजनांत नैसर्गिक फिल्टर प्रणाली आहे. तिथे पाणी शुध्दीकरण प्रकल्प नाहीत. दुसरी बाब म्हणजे या प्रकल्पासाठी देखभाल दुरुस्तीवरही खर्च होत असल्यामुळे अनेक ग्रामपंचायती पाठ फिरवत आहेत.
- बी.ए.कराड,उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, चंदगड.
-----------------------------------------------------------------------
शिरोळ तालुका
--
तीन नगरपालिका, ५२ गावांचे
सांडपाणी जाते नद्यांमध्ये
-
शिरोळ तालुक्यात ३ नगरपालिका आणि ५२ गावांचे सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळते. औद्योगिक वसाहतीमधील एसटीपी म्हणजे शोभेच्या वस्तू बनल्याने दिसते. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तीन नगरपालिकांसह ५२ ग्रामपंचायतींचे सांडपाणी थेट कृष्णा, पंचगंगा नदीत मिसळते. धरणगुत्ती ग्रामपंचायतीकडून सांडपाणी नद्यांत मिसळू नये, याची दक्षता घेतली जाते, मात्र अन्य ग्रामपंचायती उदासीन आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरग्रस्त रुग्णाचे प्रमाण असताना शासनाने नगरपालिका, ग्रामपंचायतीसह औद्योगिक वसाहतींना पुरेशा उपाय योजनांसाठी निधीची तरतूद करण्याची गरज आहे.
-----
गावागावांतील सांडपाणी थेट नद्यांत मिसळते. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नदीकाठच्या गावांत दूषित पाण्यामुळे साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याची पुरेशी दक्षता घेतली जाते. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपयोजना सुरू आहेत.
- डॉ.पांडुरंग खटावकर - तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरोळ
-------------------------------------------------
करवीर तालुका
--
एसटीपी मंजूर ६१ मात्र
कार्यान्वित एकही नाही
--
करवीर तालुक्यातील ६१ गावांत एसटीपी मंजूर असताना एकही प्रकल्प कार्यान्वित नाही. यामुळे सांडपाणी थेट ओढ्यातून भोगावती आणि पंचगंगा नदीत मिसळते. ग्रामपंचायतीतर्फे हेच नदीचे दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी सोडले जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. नदीकाठच्या गावातून ४२ तर छोट्या लोकसंख्येच्या २९ गावांत अशी एकूण ६१ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर आहेत. निधीअभावी कामे रखडले असून आरे, देवाळे अशा ८ गावांत प्रकल्पाची कामे सुरू आहे. अन्यथा अनेक ठिकाणी हे प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. काही गावांत जागेचे प्रश्न आहेत, निधीचे प्रश्न असल्याचे वस्तुस्थिती आहे. नद्या प्रदूषित होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत.
------
तालुक्यात ४६ गावांत एसटीपी मंजूर आहेत. पैकी ३८ प्रकल्पांची निविदा प्रक्रिया झाली आहे. चार कामे प्रशासकीय मंजुरीसाठी गेली आहेत. एक काम तांत्रिक मंजुरीसाठी असून, तीन ठिकाणी इस्टिमेट तयार झाले आहे. कोणतेही काम पूर्ण नसून वर्कऑर्डर झालेली नाही.
- डी.एस.पाटील, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, करवीर.
------------------------------------------------------------
गगनबावडा तालुका
--
एसटीपीची गरज नाही;
शोषखड्ड्यांद्वारे उपाययोजना
--
जिल्ह्यातील आकाराने व लोकसंख्येने सर्वांत लहान तालुका असून, एकूण २९ ग्रामपंचायती आणि ३६ हजारांपर्यंत लोकसंख्या आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींची लोकसंख्या ५००० पेक्षा कमी आहे. त्यामुळे शासन निर्णयात येथे एसटीपीसाठी निधी नाही, मात्र शोषखड्ड्यांद्वारे उपाययोजना केली आहे. तालुक्यातील २९ गावांत ९४ शोषखड्डे तयार केलेले असून, याद्वारे सांडपाण्याचे व्यवस्थापन केले आहे. गावस्तरावर शोषखड्डे, परसबाग याद्वारे सांडपाणी व्यवस्थापन केले जात आहे.
----
कमी लोकसंख्येच्या गगनबावडा तालुक्यात सांडपाणी निर्माणचे प्रमाण कमी आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे तयार केले आहेत. शोषखड्डे व परसबागेच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन केले आहे.
- अल्मास सय्यद, गटविकास अधिकारी, गगनबावडा.
-------------------------------------------------------------
राधानगरी तालुका
--
कागदोपत्री अडकले
१३ गावांचे ‘एसटीपी’
--
तालुक्यातील पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या १३ गावांना एसटीपी मंजूर झाले असले तरीही निविदा प्रक्रिया आणि वर्कऑर्डरच्या प्रतीक्षेत आहेत.
यात राधानगरी, कसबा तारळे, ठिकपुर्ली, पुंगाव, राशिवडे बुद्रुक, कौलव, सिरसे, सरवडे, धामोड, तुरंबे, सावर्डे पाटणकर, कसबा वाळवे आदी गावांचा समावेश आहे. प्रशासकीय मंजुरी असलेल्या या योजना प्रत्यक्षात सुरू नाहीत. यांच्या कामाची निविदा आणि वर्कऑर्डर नसल्याने या कागदोपत्री अडकून पडलेल्या आहेत. गटारीतून आणि नाल्यातून सांडपाणी भोगावती, दूधगंगा आणि तुळशी नद्यांत मिसळते. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाचे मार्ग थोपवण्यासाठी संथ वगतीने काम सुरू आहे.
कोट
तालुक्यात पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या १३ गावांसाठी एसटीपी मंजूर झाले आहेत. प्रशासकीय मंजुरी असली तरी निविदा आणि वर्कऑर्डर नसल्याने कामाला सुरुवात झालेली नाही. या बाबींची पूर्तता होताच कामाला सुरुवात करून योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचे प्रयत्न आहेत.
- रोहन महाजन, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राधानगरी.
----------------------------------------------------------
पन्हाळा तालुका
एसटीपीसाठी कोणी
जागा देता का जागा...
--
पन्हाळा तालुक्यात वाड्यावस्त्यांसह एकूण १३१ गावे आहे. पन्हाळ्यावर नगरपरिषदेमार्फत १११ ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत आहेत. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेने पूर्वी पन्हाळा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला होता, पण तो छोटा असल्याने अपुरा ठरत असून तयार होणाऱ्या संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल, असा प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार सांडपाणी गडाच्या चार दरवाजा या ऐतिहासिक स्मारकाजवळ एकत्र येते.
त्या ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध नाही. ऐतिहासिक स्मारक असल्याने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून नाहरकत दाखला मिळणे शक्य नाही. पन्हाळ्यातील सांडपाणी प्रकल्प हा गडाच्या पायाथ्याला उभारणे गरजेचे आहे. नगरपरिषदेकडून सोयीस्कर जागा निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोतोली, यवलूज, कळे, वाघवे,जाखले, माले, सातवे, जोतिबा (वाडी रत्नागिरी), बहिरेवाडी, कोडोली, पोर्ले ही ११ गावे पाच हजारांवर लोकसंख्या असलेली आहेत. कोडोली ग्रामपंचायतीने उभारलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. वाडीरत्नागिरी येथील प्रकल्पाचा प्रस्ताव जोतिबा विकास आखारड्यात होणार असल्यामुळे जिल्हा परिषद पातळीवर रद्द केला आहे. उर्वरित ९ गावांतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रास्तावित आहे.
--
कोट
पन्हाळा शहरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी गडाच्या पायाथ्याला खासगी जागा खरेदीसाठी वाटाघाटी चालू असून, दोन वेळा वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्धी केली होती, मात्र गडाच्या पायथ्यावरील कोणीही जागा विक्रीस तयार नाही. त्यामुळे लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील सोयीस्कर, अशी शासकीय जागा निश्चित करणे चालू आहे.
- चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक, पन्हाळा.
-----------------------------------------------------------------------------
शाहूवाडी तालुका
--
एकाही गावात नाही
सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र
--
शाहूवाडी तालुक्यात १०६ ग्रामपंचायती व मलकापूर नगरपालिका आहे, मात्र तालुक्यात एकाही ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र कार्यान्वित नाही. त्यामुळे सांडपाण्याची समस्या गावोगावी आहे. शोषखड्ड्यांद्वारे सांडपाणी मुरविले जाते. डोंगराळ भाग व वाड्यावस्त्यांमुळे त्याला मर्यादा येत आहेत. मलकापूर येथील नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळते. परिणामी प्रतिवर्षी येथे विशेष करून उन्हाळ्यात नदीचे पात्र दूषित पाण्याने तुंबलेले असते. नगरपालिकेने शाळी नदीवरची नळ पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी बंद केली आहे. स्वच्छ भारत योजनेतून सध्या भेडसगाव, शाहूवाडी, बांबवडे, सरूड या मोठी लोकसंख्या असणाऱ्या गावांत सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी कामाच्या निविदाही काढल्या आहेत, मात्र सध्या तालुक्यात एकही सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित नाही. बहुतांश ग्रामपंचायती शोष खड्ड्यांद्वारेच सांडपाणी मुरवत आहेत.
--
कोट-
तालुक्यात १०६ ग्रामपंचायती आहेत. सध्या कोणत्याही गावात सांडपाणी प्राक्रिया केंद्र नाही. शोषखड्डयांद्वारेच सांडपाणी नियंत्रित केले जात आहे. डोंगराळ व छोटी वस्त्यांच्या गावे यामुळे काही गावात अशी केंद्रे होऊ शकत नाहीत. सरूड, भेडसगाव, बांबवडे, शाहूवाडी या गावांना स्वच्छ भारत योजनेतून सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंजूर आहेत.
- मंगेश कुचेवार, गट विकास अधिकारी, शाहूवाडी.
-------------------------------------------------------------------------------------------------
आजरा तालुका-
केवळ उत्तूरला ‘एसटीपी’साठी
भाडेतत्त्वावर जमीन
--
आजरा तालुक्यात केवळ उत्तूर या गावासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) मंजूर आहे. या केंद्रासाठी ६७ लाख १५ हजार खर्च असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वर्कऑर्डर देणे बाकी आहे. तालुक्यातील उत्तूर हा उपतालुका म्हणून ओळखला जातो. गावची कुटुंब संख्या ९०० आहे. लोकसंख्या सुमारे १० हजार आहे. मोठ्या प्रमाणात येथे सांडपाणी तयार होते. येथील ग्रामपंचायतीने तीन गुंठे जागा सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. तीन शोषखड्डे घेतले जाणार आहेत. या प्रकल्पाची क्षमता १५० केएलडी आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी २५० मीटर आरसीसी पाईपलाईन करण्यात येणार आहे. दररोज साधारण १ लाख ८० हजार लीटर सांडपाण्यावर प्रकिया होणार आहे.
-
कोट
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून हा प्रकल्प मंजूर झाला आहे. पाच हजारांवर लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी एसटीपी प्रकल्प मंजूर केला जातो. आजरा तालुक्यात केवळ उत्तूर गाव येते. येथे प्रकल्प मंजूर झाला आहे. प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ वर्कऑर्डर बाकी आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल.
- एम.व्ही. तिवले, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आजरा.
--------------------------------------------------
भुदरगड तालुका
भुदरगड तालुक्यातील ९७ गावांपैकी तीन गावांत मंजूर असलेले एसटीपी प्रकल्प निविदा आणि वर्कऑर्डरच्या प्रतीक्षेत आहेत. प्रदूषणाचे मार्ग थोपवण्यासाठी संथगतीने अंमलबजावणी होत असल्याची पुढे येत आहे. तालुक्यात पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या ३ गावांना एसटीपी मंजूर आहेत. यात गारगोटी, वाघापूर व मडिलगे बुद्रुकचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यात प्रशासकीय पातळीवर वाघापूरची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मडिलगे बुद्रुकचे कामाची निविदा आणि वर्कऑर्डर मिळाली आहे, तरीही प्रत्यक्षात काम सुरू नाही. तेथे कागदोपत्रात अडकल्याचे सांगण्यात येते. गारगोटीचा जागेचा प्रश्न असल्याने काम सुरू होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. गटारीतून आणि नाल्यातून सांडपाणी वेदगंगा नदीत मिसळते. सांडपाणी थेट नद्यांतही मिसळले असल्याचे अनेक पुढे आले आहे.
--
कोट
तालुक्यात पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या तीन गावांसाठी एसटीपी मंजूर आहेत. प्रशासकीय मंजुरी असली तरी निविदा आणि वर्कऑर्डर लवकर होऊन कामाला सुरुवात होईल. योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न आहेत.
-संजय तोरसे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भुदरगड.
-----------
(संकलन लुमाकांत नलवडे, अजित माद्याळे, कुंडलिक पाटील, गणेश शिंदे, रणजित कालेकर, अरविंद सुतार, राजेंद्र दळवी, राजू पाटील, सुनील कोंडूसकर, पंडित सावंत, नरेंद्र बोते, शाम पाटील, अतुल मंडपे)
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.