फोट १ कॉलम
70729
चंदगड ः विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत.
फार्मसी, अभियांत्रिकी क्षेत्रात
करिअरच्या विविध संधी
प्राचार्य डॉ. सावंत; चंदगडला संत गजाननतर्फे करिअर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ ः फार्मसी व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत, असे मत महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन शिक्षण समूहाचे प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी व्यक्त केले. येथे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, `फार्मसीत औषधनिर्माण, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रात करिअर करता येते, तर अभियांत्रीकी शिक्षणातून सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकरी करता येते. स्वतःचा व्यवसाय, उद्योग उभारता येतो. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी आवड विचारात घेऊन विद्याशाखेची निवड करावी.
डॉ. अन्सार पटेल म्हणाले, `फार्मसी, इंजिनिअरिंगसाठी पूर्वी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, पुण्यासारख्या दूरच्या शहरात जावे लागत होते. हे अभ्यासक्रम गावापासून जवळ सुरु झाले आहेत. त्याचा लाभ करुन घ्यावा.` प्रा. मोशीन मुल्ला यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे आणि विविध शासकीय सवलती याबाबत माहिती दिली. प्रा. अमरसिंह फराकटे यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, विविध फेरी, फॉर्म भरणे, निश्चिती करणे, कॉलेजची निवड करणे याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांकरवी उत्तरे दिली. प्रा. संतोष पवार, महेश मातवणकर, संदीप काटकर, प्रसाद जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सचिन गावडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.