कोल्हापूर

गड- महालक्ष्मी सोसायटी

CD

जाहीरात संस्था असल्याने बातमी उद्या घ्यावी.

71065
गडहिंग्लज ः महालक्ष्मी वुमेन्स सोसायटीच्या सभेत डॉ. युगांतरा कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. एल.चौगुले, उत्कर्षा पोतदार, प्राची मायदेव आदी.

‘महालक्ष्मी वुमेन्स’ची
वार्षिक सभा उत्साहात
गडहिंग्लज, ता. १६ ः येथील रवळनाथ संस्था समूहातील श्री महालक्ष्मी वुमेन्स को-ऑप क्रेडिट सोसायटीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अधिष्ठाता डॉ. युगांतरा कदम प्रमुख पाहुण्या होत्या. संस्थापक व संचालक एम. एल. चौगुले, अध्यक्षा उत्कर्षा पोतदार, उपाध्यक्षा प्राची मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. कदम म्हणाल्या, ‘सामान्य माणसांच्या समस्या समजावून घेत त्या सोडविणे, त्यांच्या गरजा भागविणे हेही एक सामाजिक कार्य आहे. याच शुद्ध हेतुने महालक्ष्मी वुमेन्स सोसायटी कार्यरत आहे. श्री. चौगुले यांनी भविष्यात या सोसायटीच्या शाखा विस्तारासह त्याचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी करण्याचा मानस असल्याचे सांगितले.’ सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले. अध्यक्षा पोतदार यांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. व्यवस्थापक विद्या दळवी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सचिव गौरी बेळगुद्री यांनी मागील सभेचा वृत्तांत, कल्पना पाटील यांनी नफा-तोटापत्रक, संचालिका मधुमती पोतदार यांनी नफा विभागणी, संचालिका मीना रिंगणे यांनी अंदाजपत्रक, तज्ज्ञ संचालिका गीता चिंचणीकर यांनी लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले. सौ. मायदेव यांनी लेखापरीक्षक नेमणुकीचा ठराव मांडला. कर्जाची यादी संचालिका अलका आरबोळे यांनी वाचली. सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. डॉ. कदम यांनी आरोग्यविषयी मार्गदर्शन केले. सीमा माने यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका आसावरी स्वामी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT