71085
किटवडे (ता. आजरा) ः येथे हस्तलिखिताचे प्रकाशन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे. या वेळी प्रांताधिकारी हरेश सूळ, तहसीलदार समीर माने व अन्य.
किटवडे धनगरवाडा शाळेला
जिल्हाधिकाऱ्यांची भेट
डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन ः नवागतांचे स्वागत, विद्यार्थ्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी किटवडे धनगरवाड्यावरील शाळेला भेट दिली. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले व संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांची या धनगरवाड्याला पहिलीच भेट असल्याने धनगर बांधव भारावून गेले. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला धनगरवाड्यावर आले. शिक्षक उत्तम कोकीतकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन श्री. येडगे यांच्या हस्ते झाले. शाळेच्या हस्तलिखिताचे प्रकाशनही श्री. येडगे यांच्या हस्ते झाले. श्री. येडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले पाहिजे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्याप्रमाणे नावलौकिक मिळवला पाहिजे. या वेळी धनगर बांधवांशी संवाद साधत अडीअडचणी समजावून घेतल्या. या वेळी गणवेश, पुस्तके, रेनकोटचे वाटप झाले. प्रांताधिकारी हरेश सूळ, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, गटिवकास अधिकारी संजय ढमाळ, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, अभियंता श्री. गाडीवड्ड, केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई, गोविंद पाटील, सरपंच लहू वाकर, उपसरपंच श्री. पाटील, ग्रामसेवक रवी कांबळे आदी उपस्थित होते.
शेळप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद
शेळप येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी येडगे यांनी संवाद साधला. अभ्यासाबाबत प्रश्न विचारले. शाळेचा परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षक संभाजी बापट यांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.