कोल्हापूर

पदवीधर मित्रतर्फे रामदास आठवले यांची भेट

CD

71386
कोल्हापूर : पदवीधर मित्रतर्फे कोल्हापूर खंडपीठ समर्थनार्थ स्वाक्षरी पुस्तिकेत आपली स्वाक्षरी करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले. शेजारी माणिक पाटील-चुयेकर, उत्तम कांबळे आदी.

खंडपीठ ही सहा जिल्ह्यांची
सामाजिक गरज : मंत्री आठवले
कोल्हापूर : घटनेनुसार समाजातील सर्वच घटकांना कमीत कमी खर्चात, वेळेत न्याय मिळवून देणे शासनाला बंधनकारक आहे. या विषयीची सामाजिक गरज लक्षात घेता, कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात भेटलेल्या शिष्टमंडळास दिले. याबाबत पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर आणि ‘आरपीआय’चे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने श्री. आठवलेंची कोल्हापुरात भेट घेतली. कोल्हापूर खंडपीठ समर्थनार्थ पदवीधर मित्रच्या वतीने सुरू असलेल्या लोकप्रतिनिधींच्या स्वाक्षरी मोहिमेतील स्वाक्षरी पुस्तिकेत मंत्री आठवले यांनी आपली स्वाक्षरी केली. यावेळी ‘आरपीआय’चे राज्य सचिव मंगलराव माळगे, जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुर्लेकर, राज्य कामगार आघाडी सचिव गुणवंत नागटिळे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, रमेश पाटील, रवींद्र पाटील-येवतीकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: Out or not Out? लॉर्ड्सवर भारताच्या अपीलवर इंग्लंडच्या फलंदाजाला नाबाद देणं ठरलं वादग्रस्त; काय आहेत नियम?

Agricultural News : कांदा खरेदीत पारदर्शकता येणार! लासलगाव येथे दक्षता समिती स्थापन; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

बापरे! झी मराठीवरील 'पारु' मालिका निरोप घेणार? 'या' कारणामुळे रंगली चर्चा

Bachchu Kadu: 'कृषिमंत्री रमीमध्ये गुंग;शेतकऱ्यांचं भलं कसं होईल?'

Gold Rate: सोनं घ्यायचंय? पुढच्या आठवड्यात दर वाढतील की कमी होतील? गुंतवणुकीपूर्वी 'ही' बातमी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT