73080
निवारा केंद्रे सज्ज करा
के. मंजुलक्ष्मी; फिरती करून केंद्रांची तपासणी करा
कोल्हापूर, ता. २५ : शहरातील सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवा. सर्व प्रभाग क्षेत्रीय अधिकारी व उपशहर अभियंत्यांनी आजच फिरती करून केंद्रांची तपासणी करावी, अशी सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केल्या. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या नियोजनाचा आढाव आज महापालिकेत प्रशासकांनी घेतला.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘सर्व विभागांनी सज्ज राहावे. नागरिकांना स्थलांतरित करायच्या निवारा केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, तेथे मुरुमाचे पॅचवर्क करावे. निवारा केंद्रात द्यायच्या चहा, नाष्टा व जेवणाचे बचत गटामार्फत नियोजन करावे. नाले सफाईमुळे परिसरात नागरी वस्तीत पाणी शिरले नाही. शहरातील धोकादायक इमारती व होर्डिंग्ज उतरवून घ्या. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी काळम्मावाडी योजनेचे व्यवस्थित नियोजन करा. प्रथम पाणी येणाऱ्या भागांत नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना अग्निशमन विभागाने वेळोवेळी द्याव्यात. स्थलांतरित नागरिकांची दैनंदिन नोंद ठेवावी. पूरक्षेत्रात येणाऱ्या हॉस्पिटलला इशारा पातळी गाठताच स्थलांतरित होण्याचे पत्र आरोग्याधिकाऱ्यांनी द्यावे.’
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, कपिल जगताप, प्रीतोष कनकल, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्रे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहायक विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.