34706
हडलगे ः क्षयरोगमुक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल हडलगे ग्रामपंचायतीच्या गौरवप्रसंगी सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, अमर हिडदुगी, अमर चव्हाण, शिवगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
................
हडलगेसह तीन गावे
झाली ‘क्षयरोगमुक्त’
उपकेंद्राचा गौरव ः जनजागृती, वेळेत उपचाराचा लाभ
नेसरी, ता. ४ : आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग (टीबी) मुक्त अभियानांतर्गत ‘निश्चय आठवडा’ उपक्रमातून हडलगे (ता. गडहिंग्लज) उपकेंद्राने उल्लेखनीय कामगिरी केली. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या हडलगे, डोणेवाडी, तावरेवाडी या तिन्ही गावांना क्षयरोगमुक्त करण्यात यश आले आहे. त्याबद्दल पुरस्कार देऊन हडलगे उपकेंद्राचा गौरव झाला.
केवळ उपचारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनजागृती केली. यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा होता. प्रभावी उपाययोजना राबवून उपकेंद्राने आदर्श निर्माण केला आहे. क्षयरोगाची कारणे, लक्षणे आणि उपचारांची माहिती ग्रामस्थांपर्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आली होती. या उपक्रमाला ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला. समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक आणि आशा स्वयंसेविकांनी घरोघरी भेटी देत संशयित रुग्णांची तपासणी केली. निश्चय पोर्टलवरील नोंदींची पडताळणी करून प्रत्येक रुग्णाला वेळेत औषधोपचार मिळत आहेत का, याची खातरजमा करून उद्दिष्टांनुसार सर्व रुग्णांची तपासणी व उपचार उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले. आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. पी. कोले, आरोग्य सेविका व्ही. एस. फुटाणे, नीलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने यासाठी योगदान दिले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे यांचे मार्गदर्शन मिळाले. वेळेवर निदान आणि नियमित उपचार घेतल्यास क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. लोकसहभागातूनच गाव क्षयरोगमुक्त होऊ शकते, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सरपंच हणमंत पाटील, उपसरपंच कल्पना पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नितीन माने, डोणेवाडी सरपंच सिकंदर मुल्ला, उपसरपंच रंगराव नाईक, ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ चिंदके, तावरेवाडी सरपंच पूजा वळतकर, उपसरपंच सचिन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर कुंभार यांच्यासह सदस्य, ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. यावेळी आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतीचा पंचायत समितीतर्फे गौरव झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.