कोल्हापूर

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत दिलजमाई

CD

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत दिलजमाई

गडहिंग्लज नगरपालिका ः एकदिलाने राहण्याचे मुश्रीफांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः येथील नगरपरिषदेत सत्तेवर येऊन तीन महिन्यांच्या आतच विविध कारणांमुळे सत्तारूढ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमधील मनभेद चव्हाट्यावर आले होते. अखेर पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांना कोल्हापुरात बोलावून त्यांच्यात दिलजमाई घडविल्याचे सांगण्यात आले. उद्या (ता. ४) होणाऱ्या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही दिलजमाई महत्त्वपूर्ण आहे.
नगरपालिकेतील सत्तेची सूत्रे राष्ट्रवादीकडे आल्यानंतर महिन्याभरातच विकासकामांच्या वाटपावरून नगरसेवकांतील धुसफूस बाहेर आली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी बैठक घेऊन सर्वांनाच ताकीद दिली होती. त्यानंतर येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमातही या अंतर्गत वादाचा धागा पकडून प्रसंगी हंटर घेण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता. दरम्यान, पालिकेच्या विषय सभेत निधी दुसरीकडे वळविणे व पदाच्या सन्मानावरून पुन्हा सत्तारूढांमध्येच जुगलबंदी रंगली. याद्वारे एकमेकांमधील बेदिली चव्हाट्यावर आली. गडहिंग्लजकरांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या सत्तेचे रूपांतर एकमेकांतील मनभेदात होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून एकदिलाने शहराच्या विकासाची अपेक्षा शहरवासीयांनी केली होती. पक्षाला ऊर्जितावस्था आणणाऱ्या जिवलग मित्रांमध्येही या मनभेदाने दुरावा निर्माण झाला. नेते मुश्रीफ यांचा वाढदिवसही त्यांच्याच नगरसेवकांकडून स्वतंत्रपणे साजरा झाला. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी दुसऱ्यांदा पक्षाच्या नगरसेवकांना सबुरीचा सल्ला दिल्याने आता बैठकीत केलेली दिलजमाई प्रत्यक्ष पालिका कामकाज व सभागृहात दिसेल, अशी अपेक्षा आहे.
.........
चौकट...
मी माफ केलंय, आता मागचं विसरा
दरम्यान, ही बेदिली मुश्रीफ यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी पक्षाच्या नगरसेवकांना कोल्हापुरात बोलावून घेतले होते. ‘आतापर्यंत घडलेल्या प्रकाराबद्दल मी मोठ्या मनाने माफ केलं आहे. आता मागचं सगळं विसरून पुढे जा. एकदिलाने काम करा,’ असा सल्ला मुश्रीफ यांनी नगरसेवकांना दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उद्याच्या (ता. ४) विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात व्यासपीठावर राष्ट्रवादीतील एकजुटीच्या दर्शनाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

सावकारने किडनी विकलेल्या चंद्रपुरातील शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी, न्यायासाठी रोशन कुडेंची पायपीट सुरूच...

Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

SCROLL FOR NEXT