gad31.jpg
35197
गडहिंग्लजला गुड फ्रायडे
विविध उपक्रमांनी उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः येथील संत अॅंथोनी चर्चमध्ये दुपारी गुडफ्रायडे निमित्त ख्रिस्ती बांधवानी जागतिक शांतता व नम्रता प्रस्थापित होण्यासाठी प्रार्थना केली. गडहिंग्लजमधून संदेश फेरी काढली. यावेळी अनेक ख्रिस्ती बांधव, मुख्य धर्मगुरू ऑलवीन क्रूज, धर्मगुरु पॉल फर्नांडिस, क्रिपालयाचे सिस्टर्स व अनेक भाविक उपस्थित होते.
दुपारी बाराला गुड फ्रायडेनिमित्त शांतीचा संदेश देणारी फेरी काढण्यात आली. गुडफ्रायडेचा शुक्रवार म्हणजे सत्याचा असत्यावर विजय मानला जातो. लोकांच्या पाप क्षमेसाठी स्वत:चे बलिदान क्रूस खांबावर घेऊन जगाला संदेश येशू ख्रिस्तांनी दिला. त्यामुळे या दिवसाला उत्तम शुक्रवार (गुड फ्रायडे) म्हणून संबोधले जाते. गुडफ्रायडेच्या आधी चाळीस दिवस ख्रिस्ती बांधव उपवास करतात. गुड फ्रायडेनिमित्त गडहिंग्लजमध्ये संत अंथोनी चर्चमध्ये ख्र्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन प्रार्थना केली. दरम्यान, गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाली. चर्चचे प्रमुख धर्मगुरू ऑलवीन क्रूझ आणि धर्मगुरू पॉल फर्नांडिस यांनी प्रार्थना विधी केला. चर्चमध्ये पाय धुण्याचा अर्चन झाले. यावेळी जागतिक शांतता व नम्रतेची प्रार्थना धर्मगुरू ऑलवीन क्रूझ यांनी केली. चर्चमध्ये प्रभू भोजनचे नियोजन केले होते. रात्री अकरापर्यंत चर्चमध्ये आराधना करण्यात आली. प्रभु येशूच्या प्रेमाचा आणि त्यागाचा हा दिवस एकमेकांवर प्रेम करायला शिकवितो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.