कोल्हापूर

CD

दिंडोरीत मोटार
विहिरीत कोसळून
सात मुलांसह
नऊजणांचा अंत

सकाळ वृत्तसेवा
वणी (जि. नाशिक), ता. ३ ः जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री थरकाप उडवणारी घटना घडली. पालक आणि विद्यार्थी असलेली एक मोटार विहिरीत कोसळून नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सात विद्यार्थी आणि तीन पालकांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी दिंडोरी शहरात एका खासगी शिकवणीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर रात्री दहाच्या सुमारास सर्वजण मोटार (एमएच १५- जेएस १०५३) ने गावाकडे परतत होते. यावेळी शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत मोटार थेट कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सर्व यंत्रणांनी तेथे धाव घेतली. अंधारात विहिरीतील मोटार शोधण्यात अडचणी येत होत्या. तब्बल तीन हायड्रो क्रेनच्या साहाय्याने मध्यरात्री बाराच्या सुमारास मोटार विहिरीबाहेर काढण्यात यश आले. मोटार बाहेर काढल्यानंतर त्यातील नऊ जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. या भीषण अपघातात इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT