कोल्हापूर

कौशल्य आणि आत्मविश्वासातूनच यश : कुलगुरु पद्मश्री जी.डी. यादव

CD

35300
यड्राव ः येथे इनोव्हेशन स्पर्धेचे उद्‌घाटन करताना डॉ. गणपती यादव, डॉ. वासंती यादव, अनिल बागणे, डॉ. बी. बी. संगमे आदी.
--
उद्योगासाठी पात्र, जबाबदार नागरिक बना
कुलगुरू जी. डी. यादव : शरद इंजिनिअरिंगमध्ये ‘इनोव्हेशन २ के २६’ स्पर्धा

दानोळी, ता. ५ : विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी समजू नये, अपयश हे तात्पुरते असते; पण यश कायमस्वरूपी ठसा उमटवणारे असते. त्यामुळे शिक्षणात प्रत्यक्ष ज्ञानाचे हस्तांतरण होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी उद्योगासाठी पात्र, देशासाठी जबाबदार आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनावे, असे प्रतिपादन कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित ‘इनोव्हेशन २ के २६’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी डॉ. वासंती यादव प्रमुख उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.
कुलगुरू यादव म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामांसाठी, नवसर्जनासाठी आणि समाजोपयोगी निर्मितीसाठी करायला हवा. इनोव्हेशनसारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांत आत्मविश्वास, प्रयोगशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण करते, ते स्वतःचेच नव्हे तर देशाचे भविष्य घडवू शकतात.’ श्री. बागणे म्हणाले, ‘माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘महासत्ता भारत’ या स्वप्नपूर्तीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांची जिद्द, प्रतिभा आणि नवोन्मेषी विचारसरणी हीच खरी शक्ती ठरणार आहे. जीवनात आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे.’ यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक विभागांत विविध स्पर्धा, पोस्टर प्रेजेन्टेंशन यांसह सर्व विभागात पेपर प्रेझेंटेशनसह २५ स्पर्धा झाल्या. प्राचार्य डॉ. बी.बी. संगमे यांनी मनोगत व्यक्त केले. समन्वय प्रा. अंजली झळके यांनी केले. अदिती काळे, मंजिरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. एम. स्वामी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT