35366
शिवनेरी क्रिकेट क्लबची विजयी सलामी
दिनकरराव यादव चषक ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धाः यश, शिवराज, कपिल, ओम चमकले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ः जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित माजी आमदार स्वर्गीय दिनकरराव यादव चषक ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी स्पोर्ट्स क्लब ‘अ’ने मालती पाटील क्रिकेट अकादमीचा पराभव करीत विजयी सलामी दिली.
राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर या दोन संघांत सलामीची लढत रंगली. फलंदाजी करताना शिवनेरी क्रिकेट क्लब ‘अ’ने ४९ षटके ३ चेंडूंत सर्वबाद २२७ धावा केल्या. यात यश टेकेने ६४, शिवराज जगतापने ५४, अनिकेत नलवडेने ३३, रोहन तोरस्करने १७, आर्यन कित्तुरे याने १२ धावांचे योगदान दिले. मालती पाटील संघाकडून पृथ्वीराज निंबाळकर, सुयश साळुंखे यांनी प्रत्येकी दोन, तर हर्ष खानापूरकर, साहील भोसले, कपिल सांगावकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना पाटील संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १५२ धावांत गुंडाळला. यात कपिल सांगावकरने ६५, साहील भोसलेने ३४, सुयश साळुंखे याने १८ धावा केल्या. गोलंदाजी करताना शिवनेरी संघाकडून वीरेन पाटीलने चार, तर ओम पाटीलने तीन, शिवराज जगतापने दोन, श्रेयस पाटील याने एक गडी बाद करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हा सामना शिवनेरी संघाने ७५ धावांनी जिंकत स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उद्घाटन संभाजीराव यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘केडीसीए’चे सचिव मदन शेळके, कृष्णात धोत्रे, रमेश हजारे, किरण रावण, रहीम खान, अनिल सांगावकर, मुद्दसर मुल्ला, शौनक भिडे, प्रवीण देसाई, मंगेश शिरोडकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.