कोल्हापूर

ग्रामरोजगार सहायकांचे काम बंद

CD

ग्रामरोजगार सहायकांचे काम बंद

मानधनवाढीसाठी आंदोलन : ‘विकसित भारत’चे कामे रखडण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : राज्य शासनाने निर्णय घेतल्याप्रमाणे मानधन व भत्त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे ग्रामरोजगार सहायकांनी बुधवार (ता.१) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विकसित भारत - रोजगार आणि उपजीविका मिशनच्या (व्हीबी-जी रामजी) कामांना सध्या तरी या आंदोलनाची झळ बसलेली दिसत नाही. मात्र, या प्रश्नावर आठवडाभरात तोडगा न निघाल्यास ‘विकसित भारत’च्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत व्हीबी-जी रामजी असा बदल केला आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामरोजगार सहायक कार्यरत आहेत. अत्यल्प मानधनावर ते काम करतात. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मानधनवाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार दरमहा आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये डेटा भत्ता लागू केला. मात्र, दीड वर्ष उलटले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे ग्रामरोजगार सहायकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, या प्रश्नाकडे निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामरोजगार सहायकांनी एक एप्रिलपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जॉबकार्ड नोंदणी, मस्टर रोल तयार करणे, मजुरांची ऑनलाईन हजेरी नोंदविणे, कामांची नोंद ठेवणे यांसह विविध कामे बंद केली आहेत. या आंदोलनाचा सध्यातरी विकसित भारतच्या कामावर फारसा परिणाम जाणवत नाही. मात्र, आठवडाभरात या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास विकसित भारतचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर मानधनवाढ लागू न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा ग्रामरोजगार सहायकांच्या संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Athletics: ५८.४५ मीटर लांब थ्रो आणि नवा इतिहास! समीर देशमुखने ७ वर्षांपूर्वीचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडीत काढला!

इतकं जीव ओतून काम केलं पण... अपूर्वाने सांगितलं 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडण्याचं खरं कारण; म्हणाली, 'खूप वाईट...'

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या क्रीडांगणांवर आता CCTV, चेंजिंग रूम आणि टॉयलेट अनिवार्य! महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Kharghar Disabled girl : संतापजनक! नवी मुंबईत 17 वर्षीय दिव्यांग मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; पीडिता चार महिन्यांची राहिली गर्भवती

SCROLL FOR NEXT