कोल्हापूर

गावगाड्यातून ‘सोंगी भजन’ कला होतेय लुप्त

CD

35709
तारेवाडी : यात्रा-जत्रा, जयंतींच्या निमित्ताने हडलगेच्या श्री ज्ञानेश्वरी संगीत सोंगी भारूडी भजनी मंडळाचे कलाकार कला सादर करतात.
........................
गावगाड्यातून ‘सोंगी भजन’ कला होतेय लुप्त

भारुडातून समाजप्रबोधन ः प्रोत्साहनपर अनुदानाची कलाकारांची अपेक्षा

दिनकर पाटील ः सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. ६ : सध्या इंटरनेटच्या आधुनिक युगात जनतेचा कल सोशल मीडियावर खिळला आहे. अशा वातावरणात गावगाड्यातील पारंपरिक कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. संगीत सोंगी भजन ही कला त्यापैकीच एक. ही कलाही आता लुप्त होत असली तरी नेसरी विभागातील शिप्पूर, वाघराळी, हडलगे परिसरातील सोंगी भजन कलाकारांकडून अल्प विडा घेऊन का होईना ही कला जतन करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
सोंगी भजनी मंडळांना मोजक्याच सण-समारंभातून विडा मिळतो. तोही अल्प असतो. मेकअप, वाद्य, साहित्य खर्च, कपडे, कुशल कलाकारांची कमतरता, वाहतूक खर्च, कलाकार मानधन आणि विड्यातून मिळणारी अल्प रक्कम यांचा मेळ घालताना भजनी मंडळांना तारेवरची कसरत करावी लागते. रंगीत तालीम आणि प्रत्यक्षात सोंगी भजन कार्यक्रम सादर करताना खर्च आहे. विड्यातून मिळणारी रक्कम तुटपुंजी असते. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही सोंगी भजनी मंडळे सेवा आणि परंपरा जतन करण्याच्या माध्यमातून अल्प विडा घेऊन कार्यक्रम सादर करत आहेत. प्रेक्षक वर्गाचा मिळणारा अल्प प्रतिसाद यामुळे परंपरागत भजनी मंडळांनी आधुनिकतेची जोड देऊन लावणी कला प्रकार सादर करून प्रेक्षक वर्गाला आकर्षित करम्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात परंपरागत संगीत सोंगी भजन कला लुप्त होण्याच्या मार्गावर असतानाच नेसरी परिसरातील हडलगे, शिप्पूर तर्फ नेसरी, वाघराळी येथील संगीत सांप्रदायिक भजनी मंडळे सोंगी भजन कला जतन करत आहेत.
...........
चौकट...
सोंगी भजनातून प्रबोधन
सोंगी भजनातून विधिवत गणेश पूजन, वारकरी दिंडी, रिद्धी-सिद्धी, मुक्का, संत भारुडे, वाघ्या-मुरळी, नवरा-बायकोचे भांडण, रामायण, महाभारतील ठळक प्रसंगांतून समाजप्रबोधनाबरोबरच मनोरंजन केले जाते. शासन नोंदणीकृत सोंगी भजनी मंडळांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन कला जतन करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी मागणी कलाकारांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT