कोल्हापूर

मावळत्या सूर्यालाही लोक नमस्कार करतात

CD

35892
नाईकवाडी ः हालसिद्धनाथ मंदिर सभागृहाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना राजेश पाटील. शेजारी रामाप्पा करिगार, महाबळेश्वर चौगुले, सागर पाटील, प्रभावती बागी.
----------------
मावळत्या सूर्यालाही
लोक नमस्कार करतात

राजेश पाटील ः नाईकवाडीत सांस्कृतिक हॉलचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ७ ः ‘आमदारकीच्या कालावधीत मतदारसंघात सोळाशे कोटी रुपये विकास निधी आणला. परंतु गेल्या निवडणुकीत धनशक्तीने जनशक्तीवर मात केली. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतातच. मात्र, मावळत्या सूर्यालाही नमस्कार करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पराभूत झालो असलो तरी जनतेचे माझ्यावरील प्रेम कमी झालेले नाही. हीच माझ्या विकासकामाची पोचपावती आहे. यापुढेही विकासकामात कुठेच कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही माजी आमदार राजेश पाटील यांनी दिली.
जरळी (ता. गडहिंग्लज) येथील जरळीपैकी बाबाण्णावर व नाईकवाडी वसाहतीमधील सांस्कृतिक हॉलच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरपंच सागर पाटील अध्यक्षस्थानी होते. या हॉलसाठी माजी आमदार पाटील यांनी १५ लाखांचा निधी दिला आहे.
हालसिद्धनाथ मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमास धनगरी वालंग वादन कार्यक्रम झाला. अभिषेक, दंडवत असे धार्मिक झाले. यावेळी अनिकेत कोणकेरी, अभिजित पाटील यांची भाषणे झाली. हालसिद्धनाथ मंदिर समितीतर्फे सर्वांचा सत्कार झाला. रामाप्पा करिगार, बाबासाहेब पाटील-मुगळीकर, महाबळेश्वर चौगुले, ऋषिकेश पाटील, प्रभावती बागी, गंगाराम बाबाण्णावर, कुमार नाईक, बाळू धनगर, सुरेश हजारे, बाळू धनगर, आल्लाप्पा बाबानावर, महादेव धनगर, विठ्ठल धनगर, मनोहर नाईक आदी उपस्थित होते. विठ्ठल चौगुले यांनी स्वागत केले. रामचंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संजना बाबाण्णावर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT