कोल्हापूर

पुनर्चक्रीकरणाची भिंत उपक्रमाचे दसरा चौकात उद्‍घाटन

CD

पुनर्चक्रीकरणाची भिंत
उपक्रमाचे उद्‍घाटन
जुनी कपडे, खेळणी, ई-वेस्ट आदी देण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. ७ : पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी ‘पुनर्चक्रीकरणाची भिंत’ या उपक्रमाचे उदघाटन दसरा चौकात झाले. अवनि, एकटी संस्था, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, महापालिका आणि कचरा वेचक महिला यांच्यातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे. नगरसेवक अश्किन आजरेकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. शहरातील ई-वेस्ट व कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकतो. शहरात अशा भिंतींचे कायमस्वरूपी नियोजन करून हा प्रश्न सोडवता येईल. यासाठी महापालिकेशी समन्वय साधावा, असे आवाहन नगरसेवक आजरेकर यांनी केले.
‘कचरा ही संपत्ती आहे’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून घरातील वापरात नसलेल्या वस्तू स्विकारल्या जाणार आहेत. जुनी कपडे, खेळणी, फर्निचर, प्लास्टिक साहित्य, भांडी, ई-वेस्ट या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या पुनर्निर्मिती व पुनर्वापरातून तयार झालेल्या वस्तूंचे प्रदर्शन ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी दिली. किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे सीएसआर अधिकारी शरद आजगेकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, सविता कांबळे, संगीता लाखे, भारती कोळी, अक्षय कांबळे, पूजा लोहार, साहिल शिकलगार, नयन जाधव, अन्नपूर्णा कोगले उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT