कोल्हापूर

गॅस पुरवठ्याचा बोजवारा

CD

36000
तेरणी ः गाडी येणार म्हणून गावातील चौकात ग्राहक सिलिंडर रांगेत ठेवून गॅसच्या प्रतीक्षेत आहेत.
-----------------------------------------------------
गॅस पुरवठ्याचा बोजवारा

हलकर्णी भागातील प्रश्न ः कायम ग्राहकांनाही पुरवठा होतोय खंडित

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ ः हलकर्णीतील वितरकाकडून काही गावांतील शेकडो ग्राहक गडहिंग्लजच्या वितरकांकडे वर्ग झाले आहेत. त्यांना गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. शिवाय हलकर्णीतील वितरकाकडे कायम असलेल्या काही गावांतील ग्राहकांनासुद्धा पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या भागातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना भेटून गाऱ्हाणी मांडली.
हलकर्णी भागातील ग्राहकांच्या सोयीसाठी हलकर्णीत वितरक नेमला आहे. अनेक वर्षांपासून हे केंद्र सुरू आहे. परंतु, गेल्या महिन्यात या केंद्रातील काही गावांतील शेकडो ग्राहक गडहिंग्लजच्या वितरकाकडे वर्ग झाले आहेत. काही ग्राहकांना तर आपले कार्ड गडहिंग्लजला वर्ग झाल्याचेही माहीत नाही. गावात गाडी येते म्हणून ग्राहक प्रतीक्षेत होते. अधिक चौकशीनंतर ग्राहकांना आपले कार्ड गडहिंग्लजला वर्ग झाल्याचे समजले. गडहिंग्लजमधील संबंधित वितरकाकडून गाडी जात असली तरी ४० ते ५० सिलिंडरच उपलब्ध होतात. त्यामुळे बहुतांश ग्राहकांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागते. त्यांना सिलेंडरसाठी गडहिंग्लज गाठावे लागत आहे.
दरम्यान, हलकर्णीतील वितरकाकडे काही गावांतील ग्राहक कायम आहेत. त्यांनाही सिलिंडर मिळण्यात अडचणी आहेत. हलकर्णीतील वितरकाकडून गावोगावी गॅस सिलिंडर पुरवठा होत नसल्याची तक्रार तहसीलदारांसमोर मांडली. रोज ग्राहक गॅस एजन्सी केंद्रासमोरही उन्हात ताटकळत थांबतात. मात्र, त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. स्थलांतरित केलेल्या ग्राहकांचेही प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे गॅसपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, अशा इशारा पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले, बाळेश नाईक, रमेश पुजारी, करवीर उथळे, सुरेश कतीगार, जितेंद्र पाटील, पिराजी चव्हाण, करवीर नंद्यापगोळ आदींच्या शिष्टमंडळाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT