36293
गडहिंग्लज ः झेप अकॅडमीतर्फे प्रणव पाटील व संतोष वाळकी यांचा सत्कार एम. एल. चौगुले व डॉ. आर. एस. निळपणकर यांच्याहस्ते झाला. यावेळी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
-------------------------
‘झेप’तर्फे पाटील, वाळकी यांचा सत्कार
गडहिंग्लज ः येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी प्रणव पाटील व संतोष वाळकी यांचा सत्कार करण्यात आला. रवळनाथ हाउसिंग फायनान्सचे संस्थापक एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर प्रमुख उपस्थित होते. ‘झेप’चा विद्यार्थी प्रणव पाटील याची कर सहायक व महसूल सहायकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. निळपणकर यांच्या हस्ते, तर पुणे शहर पोलिस दलात निवडीबद्दल वाळकीचा सत्कार चौगुले यांच्याहस्ते झाला. ‘झेप’च्या माध्यमातून आतापर्यंत ५० हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले असून, भविष्यात ते क्लास वन अधिकारी होतील, याचा विश्वास चौगुले यांनी व्यक्त केला. पाटील व वाळकी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महेश मजती, डॉ. प्रभाकर द्राक्षे आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड यांनी सूत्रसंचालन केले. ‘रवळनाथ’चे सीईओ डी. के. मायदेव यांनी आभार मानले.
.......................
ओंकारमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा
गडहिंग्लज ः येथील ओंकार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे बीए व बी कॉम भाग ३ च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. बी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. संजीवनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सानिका पसारे, सुरेखा घोळसे, सारिका देवेकर, विद्या चौगुले, आदर्श सावंत, अश्विनी कुंभार, साक्षी धुरे, समृद्धी निकम, रिद्धी पाटील, निर्गुण कदम यांची भाषणे झाली. मीनल डिसुजा यांचा सन्मान करण्यात आला. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर, डॉ. शर्मिला घाटगे, डॉ. सुरेश चव्हाण, डॉ. काशीनाथ तनंगे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. कविता पोळ यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा बनसोडे यांनी आभार मानले.