36355
आजरा ः येथे सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांना निवेदन देताना डाॅ. स्मिता कुंभार. यावेळी अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, असिफ पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी व अन्य पदाधिकारी.
-----------------------------------------------------------------
आजरा तालुक्यातील
अमली पदार्थ विक्री रोखा
नगरसेवकांची मागणी ः आजरा पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः तालुक्यात चोरून अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. यामुळे तरुणांमध्ये बेशिस्तपणा वाढत चालला आहे. आजऱ्यात घ़डलेली दुर्दैवी घटना हा त्याचाच भाग आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावावर आळा घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आजरा नगरपंचायतीच्या विरोधक नगरसेवकांनी आजरा पोलिसांत केली आहे. याबाबतचे निवेदन सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांना दिले आहे.
आजरा शहराची सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील परंपरा आजपर्यंत आदर्शवत आहे. तथापि, शहरात आठवडाभरापूर्वी घडलेली घटना दुर्दैवी आहे. किरकोळ वादातून दोन जिवलग मित्रांमध्ये वाद होऊन एकाचा खून झाला. ही घटना संपूर्ण शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. शहरात व तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका बळावत चालला आहे. अमली पदार्थांचे सेवन व त्याची अवैद्य विक्री केवळ कायद्याच्या दृष्टीने गुन्हा नसून समाजाच्या आरोग्याला व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आजरा पोलिसांनी शहर व तालुक्यात अमली पदार्थांच्या विक्री व वितरणावर कठोर कारवाई करावी. अवैध कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांचा बिमोड करावा. तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना अशा व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधनात्मक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर नगरसेवक अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, असिफ पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी, विक्रम पटेकर, नगरसेविका स्मिता कुंभार, रेश्मा बुड्डेखान यांच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.