कोल्हापूर

इचल : डबल पट्टा

CD

जैन फ्रेन्डस सर्कलतर्फे
महाआरोग्य तपासणी शिबिर

इचलकरंजी ः येथील जैन फ्रेन्डस सर्कल व अथायू हाॅस्पिटल, कोल्हापूर यांच्यातर्फे रविवारी (ता. १२) सकाळी १० ते २ या वेळेत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. महावीर जैन भवन येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात हृदयविकार, मूत्रविकार, हाडांचे विकार, त्वचारोग, कॅन्सरपूर्व निदान यावर तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी ईसीजी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, वजन तपासणी, लघवी तपासणी, हाडांची ठिसूळता तपासणी आदी मोफत करण्यात येणार आहे. तर अन्य महत्त्वाच्या तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रमेश बालर, सचिव नीतेश छाजेड, प्रकल्पप्रमुख दिनेश छाजेड यांनी केले आहे.

‘महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत’
इचलकरंजी ः महापालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने (इव्ही) खरेदी करावीत, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी महापौर, उपमहापौर, आयुक्त व विरोधी पक्षनेता यांना दिले आहे. सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाहनांवर दरमहा मोठा खर्च होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने वापरल्यास एका वाहनामागे २० ते २५ हजारांपर्यंत बचत होण्यासह वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
-----------
जलपर्णी लोकसहभागातून
काढणार ः महापौर
इचलकरंजी ः पंचगंगा नदीतील जलपर्णी लोकसहभागातून काढणार असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली. या कामात महापालिकेचा सर्वप्रथम पुढाकार असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जलपर्णी काढण्याबाबत महापालिकेने स्वयंसेवी संस्थांना आवाहन केल्याचे महापौर धातुंडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे इचलकरंजीला पंचगंगा नदीतून अंशतः पाणीपुरवठा केला जातो.
-------------
आशांचे महापौरांना निवेदन
इचलकरंजी ः लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरल्याच्या कामाचे मानधन मिळावे, अशी मागणी आशा वर्कर्स युनियनच्या शिष्टमंडळाने महापौर उदय धातुंडे यांना निवेदनाव्दारे केली. या कामबाबत बैठक घेऊन मानधन देण्याची घोषणा करण्यात आली होती; पण त्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही, असे निवेदनात नमूद केले आहे. सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : भांडुपमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा 19 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT