कोल्हापूर

२ कॉलम संक्षिप्त पट्टा

CD

36334
अंजू तुरंबेकर

भुतानच्या महिला संघाच्या
प्रशिक्षकपदी अंजू तुरंबेकर
गडहिंग्लज : बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांची भुतानच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघ प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. भुतीन महिला फुटबॉल संघाच्या टेक्निकल डायरेक्टर (तांत्रिक संचालक) म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. परदेशात महिला प्रशिक्षक म्हणून प्रथमच अंजू तुरंबेकर यांची निवड झाली आहे. तुरंबेकर या एएफसी प्रो लायन्सधारक प्रशिक्षका आहेत. आशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरुट समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट विभागात प्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. गोवा धेम्पो अकादमी, बंगळूर साऊथ युनायटेड अकादमीच्या तांत्रिक संचालक म्हणूनही काम केले आहे. येथील एटी फाउंडेशनच्या त्या प्रमुख आहेत. भुतान महासंघाचा विश्वास चांगले काम करून सार्थकी लावू, असे अंजूने निवडीनंतर सांगितले.

........................
36364
आजरा ः व्यंकटराव महाविद्यालयाच्या कबड्डी खेळाडूंसोबत मार्गदर्शक शिक्षक.
-----------------------------------------------------------------
‘व्यंकटराव’च्या खेळाडूंची कबड्डी स्पर्धेसाठी निवड
आजरा ः येथील व्यंकटराव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील मधुरा प्रकाश दळवी व साधना महेश होसूरकर यांची सिन्नर (जि. नाशिक) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच व्यंकटरावचे कबड्डी खेळातील वर्चस्व कायम ठेवत कोथळी (ता. करवीर) येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय खुल्या महिला कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चुरशीचा लढतीत द्वितीय क्रमांक मिळवला.      खेळाडूंना शिक्षक पी. आर. तेरसे, पी. एल. सासूलकर यांचे मार्गदर्शन मिळाले. सचिन शिंपी यांनी खेळाडूंचा सत्कार केला.  यावेळी प्राचार्य एस. व्ही. शेळके, प्रभारी प्राचार्य सी. एस. पन्हाळकर उपस्थित होते.
..........................
12710
इचलकरंजी : खेलो इंडिया अस्मिता लीग तलवारबाजी स्पर्धेतील विजेत्यांसोबत शिक्षक.

तलवारबाजीत इंदुमती आवाडे मयूर हायस्कूलचे यश
इचलकरंजी : महाराष्ट्र शासनाच्या व भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खेलो इंडिया अस्मिता लीग तलवारबाजी स्पर्धेत सौ. इंदुमती आवाडे मयूर हायस्कूलच्या खेळाडूंनी यश मिळविले. ही स्पर्धा डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर येथे झाली.
स्पर्धेत विविध गटांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. १२ वर्षे मुली (इपी) गटात अनघा येलपलेने रौप्यपदक पटकावले. तसेच सेबर प्रकारात दुर्वा औताडे व स्नेहल खंदारे यांनी ब्राँझपदक पटकावले. १७ वर्षे मुली (इपी) गटात किरण मानेने ब्राँझपदक मिळवले. १९ वर्षे मुली (फॉईल) गटात रेचल माटेकरने रौप्यपदक, सृष्टी कांबळे व शीतल सनदी यांनी ब्राँझपदक पटकावले.
...............................
किणीत उद्या पट सोंगटी स्पर्धा
घुणकी ः किणी (ता. हातकणंगले) येथील जय हनुमान पट सोंगटी मंडळाच्या वतीने पट सोंगटी स्पर्धा शनिवारी (ता. ११) आयोजित केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र पट सोंगटी फेडरेशनच्या नियमानुसार खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय पट सोंगटी स्पर्धेच्या अनुक्रमे चार क्रमांकांना १५ हजार, १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तसेच पाच ते आठ क्रमांकांसाठी एक हजार रुपये व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. किणी टोल नाक्याजवळील देवाशी समाज सेवाभावी संस्थेच्या हाॅलमध्ये सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‍घाटन होईल. जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जय हनुमान पट सोंगटी मंडळाच्या वतीने केले आहे.
.......................
तानाजीराव डवंग यांना राष्ट्रीय कृषिभूषण पुरस्कार प्रदान
कोतोली : तेलवे (ता. पन्हाळा) येथील प्रगतशील शेतकरी तानाजी डवंग यांना पणजी (गोवा) येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. राठोड फाउंडेशनतर्फे मेरा युवा भारत योजनेचे संचालक कालिदास घटवाल यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. डवंग ‘ऊस लक्ष्य एकरी १०० टन’ ही मोहीम राबवत असून, त्यामध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी गोवा विधानसभेचे संयुक्त सचिव मोहन गावकर, शिवाजी पाटील, शिवाजीराव जमदाडे, डॉ. सुरेश राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT