कोल्हापूर

शिवसेनेतर्फे बाळासाहेबांच्या विचारांचा जागर

CD

36472
गडहिंग्लज : शिवसेनेच्या बैठकीत उदय दळवी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी भोकरे आदी उपस्थित होते.
---------------------------
शिवसेनेतर्फे बाळासाहेबांच्या विचारांचा जागर

जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त : गडहिंग्लजला बैठकीत उपक्रमांचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उबाठा) येथील विभागीय कार्यालयात बैठक झाली. कोल्हापूर जिल्हा निरीक्षक उदय दळवी प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात वर्षभर बाळासाहेबांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. बैठकीत उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, युवकांचे मेळावे, महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रमुख गावांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत बाळासाहेबांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याचे सांगितले. उदय दळवी यांनी जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेब व शिवसेनेच्या विचारांचा जागर करतानाच संघटनात्मक आघाडीवरही काम करण्याचे आवाहन केले.
आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी स्वागत केले. शिवसैनिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. यात प्रत्येक गावच्या शिवसैनिकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले. संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, शांता जाधव, विमल पाटील, कृष्णा डाकरे, गणेश बागडी, विष्णू गावडे, महेश पाटील आदी उपस्थित होते. जयसिंग टिकले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

Latest Marathi News Live Update : अभिजीत दिपके यांचे छत्रपती संभाजीनगरात आगमन; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बॉलिवूड गाजवणाऱ्या माधुरीनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत का काम केलं नाही? हे होतं कारण

निवृत्तीचं शेवटचं वर्ष, सुट्टीवरून ड्युटीवर परतण्याच्या आदल्या दिवशी जवानाने उचललं टोकाचं पाऊल

Akola : पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावाधाव, नर्सपासून डॉक्टरांपर्यंत विनवण्या; कुणीच मदत केली नाही, VIRAL व्हिडीओने खळबळ

SCROLL FOR NEXT