कोल्हापूर

डी. डी. शिंदे कॉलेजमध्ये कार्यशाळा

CD

36589
गडहिंग्लज ः शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यशाळेत मनीष कुलकर्णी यांचा सत्कार डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी केला. यावेळी स्वाती कोरी उपस्थित होत्या.
---------------------------
‘डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग’वर
शिंदे इंजिनिअरिंगमध्ये कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ ः भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स विभागातर्फे ‘पी. सी. बी. डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर एकदिवसीय हँड्स-ऑन कार्यशाळा उत्साहात झाली.
मनीष कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रिंटेड सर्किट बोर्ड डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेबाबत माहिती दिली. सर्किट डिझाईनची तत्त्वे, इलेक्ट्रॉनिक घटकांची निवड, स्केमॅटिक डिझाईन, पी. सी. बी. लेआउट डिझाईन या बाबींचे धडे विद्यार्थ्यांना दिले. आधुनिक सॉफ्टवेअर टूल्सचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डिझाईन तयार करण्याचा अनुभव दिला. पी. सी. बी. मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांना पी. सी. बी. तयार करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मदत झाली. मनीष कुलकर्णी यांचा सत्कार प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांच्या हस्ते झाला.
कार्यशाळेसाठी संस्थाध्यक्षा ऊर्मिला शिंदे, सचिव प्रा. स्वाती कोरी, सल्लागार महेश कोरी यांचे प्रोत्साहन मिळाले. कार्यशाळेला विभागप्रमुख प्रा. महादेव बंदी यांचे सहकार्य मिळाले. समन्वयक प्रा. इरफान त्रासगर यांनी नियोजन केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण झाले. प्रा. अभिषेक मगदूम, प्रा. श्वेता भोई, प्रा. शुक्रांती पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT