कोल्हापूर

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वाडीकरांसह डॉ. सुप्रिया देशमुख अखेर निलंबित

CD

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वाडीकरांसह
डॉ. सुप्रिया देशमुख अखेर निलंबित
सीपीआरमधील लाल डायरी, देयके अनियमितता प्रकरणी कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : सीपीआरमधील लाल डायरीप्रकरणी चौकशीत दोषी असल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर व तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश रात्री उशिरा सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी नील कुमेरीये यांनी काढले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिले मंजुरीसाठी आर्थिक देवाणघेवाण होते, या विषयावर आंदोलन केले होते. यावेळी शल्यचिकित्सक कार्यालयातच लाल रंगाची डायरी सापडली होती. या डायरीत काही रक्कम व त्यासमोर काही डॉक्टरांची नावे लिहिली होती. याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या डायरीतील नोंदीत रकमा कोणत्या व्यवहाराच्या आहेत, अशी विचारणा केली होती. तेव्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला होता. त्यामुळे या रक्कमांविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
पुढे या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार घडल्याबद्दल काही आमदारांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीनेच १५ दिवस शल्यचिकित्सक कार्यालयातील आर्थिक व्यवहारांच्या फायली तपासल्या होत्या. त्यात काही नोंदी या संदिग्ध आढळल्या होत्या. शासकीय नियमानुसार या नोंदी नसल्याचे स्पष्ट झाले होते. या नोंदीत अनियमितता होती. या नोंदी करण्याचे काम ज्यांच्याकडे होते, त्यांनी ते न करता अन्य दोन कक्ष सेवकांकडून करून घेतले होते. तसेच एक चतुर्थश्रेणी कर्मचारी ही त्यांना साहाय्य करत असल्याचे चौकशीतून समोर आले होते; मात्र, अंतिम जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची होती. त्यामुळे या आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांना यासाठी जबाबदार धरून त्यांचे निलंबन करण्यात आले.

चौकट...
कक्षसेवकांच्या बदलीची शिफारस
या प्रकरणातील दोन कक्षसेवकांची बदली करण्याची शिफारस चौकशी समितीने अहवालात केली होती. त्यानुसार आरोग्य उपसंचालक पातळीवर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच अन्य एका कर्मचाऱ्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.

कोट
दोन्ही जिल्हा शल्यचिकित्सकांवर निलंबनाची कारवाई केल्याबाबतचे आज रात्री उशिरा मिळाले आहेत.
- डॉ. दिलीप माने, आरोग्य उपसंचालक

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT