कोल्हापूर

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात

CD

36698
दानोळी : येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या तिरुपती मांगले संघाला चषक बक्षीस देताना मान्यवर.
....................
तिरुपती मांगले विजेता,
अजिंक्यतारा उपविजेता

आंबेडकर जयंतीनिमित्त दानोळीत क्रिकेट स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ११ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एस. एम. जी. स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्त्व युवा विचार मंच, गोठणे-दानोळी यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. अंतिम सामन्यात तिरुपती मांगले (सांगली) संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अजिंक्यतारा सांगाव (कोल्हापूर) संघ उपविजेता ठरला. वारणा स्पोर्टस् (गोठणे-दानोळी) संघाने तृतीय आणि विजय स्पोर्टस (अकिवाट) संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.
विजेत्या संघांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, सहा हजार व पाच हजार रुपये रोख पारितोषिके, चषक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये संतोष पाटील (अजिंक्यतारा वाडदे, सांगाव) याची उत्कृष्ट फलंदाज, ओंकार पाटीलची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली. वारणा स्पोर्टसच्या नदीम चौगुलेने ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला. तर अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार राम वकटे (तिरुपती स्पोर्टस्, मांगले) याला मिळाला.
यावेळी स्पर्धा संयोजक दीपक गोठणेकर, नजीर चौगुले, विकास घोलप, ॲड. सिद्धार्थ काकडे, दाऊद पटेल, आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन अजय कांबळे, रवी तांबे, शुभम घोलप, नीलेश कांबळे, संदेश कांबळे, प्रशिक कांबळे, आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT