कोल्हापूर

अकादमी मान्यतेसाठी बाल, कुमार संघ सक्तीचे

CD

36762
फुटबॉल अकादमीच्या सरावाचे संग्रहित छायाचित्र
......................
अकादमी मान्यतेसाठी बाल, कुमार संघ सक्तीचे

‘एआयएफएफ’चा निर्णय : नवोदित फुटबॉलपटूंना संधी; स्थानिक ‘टॅलेंट’ला वाव

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) २०२६-२७ हंगामासाठी अकादमी मान्यतेचे नवे निकष जाहीर केले असून, १२ व १४ वर्षांखालील संघ अनिवार्य केले आहेत. त्यामुळे बाल व कुमार गटातील फुटबॉलपटूंना अधिक संधी मिळणार असून, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या अकादमींना अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत.
नव्या नियमानुसार प्रत्येक अकादमीकडे किमान एक संघ व २० नोंदणीकृत खेळाडू असणे बंधनकारक आहे. स्पर्धात्मक अनुभव वाढावा यासाठी एआयएफएफ मान्यताप्राप्त प्रत्येक पाच सामन्यांसाठी दोन गुण दिले जातील. यंदा मुलांच्या गटात २० वर्षांखालील आणि मुलींच्या गटात १८ वर्षांखालील विभागाची भर घातली आहे. यूथ लीगमधील प्रत्येक सामन्यातील विजयाला गुण मिळणार असून, यापूर्वी केवळ अंतिम फेरीतील संघांनाच गुण दिले जात होते.
स्थानिक ‘टॅलेंट’ला चालना देण्यासाठी १०० मिनिटांपेक्षा अधिक वेळ खेळणाऱ्या खेळाडूंना बोनस गुण देण्याची तरतूद आहे. तसेच खेळाडू राखून ठेवण्याचा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढविला आहे. १७, २० आणि २३ वर्षांखालील राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूंमुळे संबंधित अकादमीला अतिरिक्त गुण मिळतील.
पायाभूत सुविधांनाही प्राधान्य देण्यात आले असून मैदान, निवास व वैद्यकीय सुविधा यासाठी अधिक गुण दिले जाणार आहेत. ‘सी’ परवानाधारक प्रशिक्षक अनिवार्य असून, खेळाडूंचा विमाही सक्तीचा आहे. प्रशिक्षक अभ्यासक्रमाबरोबरच दुखापत व्यवस्थापन कार्यशाळा घेणाऱ्या अकादमींनाही प्रोत्साहन मिळेल. गतवर्षी १४२ अकादमींनी मान्यतेसाठी अर्ज केले होते.

चौकट....
कोल्हापुरात आय-लीग संघ कधी?
कोल्हापूरमध्ये फुटबॉलचा मोठा विस्तार झाला असून, शंभरहून अधिक संघ व दोन हजारहून अधिक खेळाडू नोंदणीकृत आहेत. मात्र, नवोदितांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रगतीला मर्यादा येत आहे. पन्हाळ्याच्या संजीवन स्पोर्टस् अकादमीने यंदा यूथ आय लीगमध्ये प्रवेश केला, तर एसथ्री अकादमीने महाराष्ट्र लीगमध्ये पाऊल ठेवले आहे. कोल्हापूरमधील संघांनीही आय-लीगमध्ये सहभाग घेतल्यास स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
०००००००००००००००००००००००००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT