कोल्हापूर

आजरा तालुकावासियांचा आज स्नेहमेळावा

CD

आजरा तालुकावासीयांचा आज स्नेहमेळावा
कोल्हापूर : आजरा तालुकावासीयांचा स्नेहमेळावा रविवारी (ता. १२) सायंकाळी साडेचार वाजता न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित केला आहे. यावेळी आजरा तालुक्यातील हाळोली येथील संदीप कांबळे यांच्या कराओके गायनाचा कार्यक्रम होईल. तरी कोल्हापुरात राहणाऱ्या आजरा तालुकावासीयांनी स्नेहमेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
............
पाचगावात आजपासून प्रबोधनात्मक सप्ताह
कंदलगाव : विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पाचगाव येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा सप्ताह आयोजित केला आहे. येथील भीमराज तरुण मंडळाच्या वतीने रविवार (ता. १२) ते सोमवार (ता. २०) अखेर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, पुतळा अनावरण, व्याख्यान, होम मिनिस्टर स्पर्धा, भीम गीते, मिरवणूक असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहन कांबळे, उपाध्यक्ष प्रज्ञावंत कांबळे आणि खजानिस प्रेमकुमार कांबळे यांनी दिली.
.............
आजऱ्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी नऊ अर्ज
आजरा ः तालुक्यात पेरणोली, हरपवडे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी, तर हरपवडे, मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे येथे सदस्यपदासाठी पोटनिवडणूक लागली आहे. आज अर्ज भरण्याच्या चाैथ्या दिवशी नऊ अर्ज दाखल झाले. सरपंचपदासाठी सहा, तर सदस्यपदासाठी तीन अर्ज दाखल झाले यामध्ये सरपंचपदासाठी पेरणोली ४, तर कोरीवडेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. सदस्यपदासाठी धामणे दोन, तर हरपवडेसाठी एक अर्ज दाखल झाला आहे. देऊळवाडी, मडिलगे व बहिरेवाडी येथे एकही अर्ज दाखल झालेला नाही.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Koyna Dam Water: कोयनेतील ‘महाजनको’चा कोटा संपुष्टात; वीजनिर्मितीवर परिणाम, राज्यात भारनियमनाचे संकट, सातारा-सांगलीसमोर पाणीटंचाईचे संकट

Monsoon Delay India : मान्सून श्रीलंकेतच रेंगाळला, केरळमध्ये 'या' दिवशी धडकणार; महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर? IMD चा नवा अंदाज समोर

Maharashtra Cabinet Delhi visit: दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाची धडक; साखर, कांदा आणि जलजीवन मिशनवर निर्णायक बैठक, शेतकरी आणि पाणी प्रश्नांवर मंथन

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बनवा थंडावा देणारे बडीशेपचे सरबत! लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT