कोल्हापूर

सतेज पाटील लेख

CD

‘ब्रँड महाराष्ट्र’

दरवर्षी जिल्ह्यासाठी भूषणावह कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आमदार सतेज पाटील ब्रँड कोल्हापूर म्हणून गौरव करतात. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उज्वल करणाऱ्या धुरिणांचा समावेश असतो. १९९३ पासून ते शिवाजी विद्यापीठाचे सदस्य ते काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते हा त्यांचा प्रवास पाहता तेच आज स्वतः ब्रँड महाराष्ट्र म्हणून सर्वत्र परिचित झाले आहेत.
वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी गगनबावडा साखर कारखान्याची उभारणी, मौनी विद्यापीठाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र शासनात ताकदीने सांभाळलेली गृह, ग्रामविकास, परिवहन, अन्न व औषध प्रशासन खात्याची मंत्रीपदे ते जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि आता काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेतेपद याद्वारे त्यांनी राज्याला समाजाभिमुख विकासाच्या दृष्टीने वेगळ्या उंचीवर ठेवण्याचा प्रामणिक प्रयत्न केलेला आहे. आमदार सतेज पाटील म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहते ती प्रचंड आत्मविश्वास, धडाकेबाज निर्णय क्षमता, रचनात्मक कार्य, जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेली कल्पक प्रचार व प्रसार यंत्रणा. समाजसेवेसाठी चोवीस तास वेळ देण्याची उर्मी असलेले व्यक्तिमत्त्व. आज हेच व्यक्तिमत्त्व दिल्ली दरबारापर्यंत ब्रँड महाराष्ट्र म्हणून वावरत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वैचारिक निष्ठाप्रिय माणूस ते झुंझार नेता हे त्यांचे पैलू महाराष्ट्राने स्वीकारण्यासारखे आहेत.
जिल्ह्यात काँग्रेस विरोधात सारे एकवटले आहेत. अशावेळी काँग्रेसच्या विचारांचे पाईक बनून ते लढाई लढत आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. कोल्हापूर महापालिकेला सगळे सत्ताधारी एका बाजूला असताना ‘कोल्हापूर कसं ! तुम्ही म्हणशीला तसं !’ ही साद त्यांनी कोल्हापूरकरांना घातली आणि जनतेनं सुचविलेला विकासाचा अजेंडा आपल्या कल्पक चातुर्याने लोकांपुढे अनोख्या पद्धतीने मांडला. मात्र, काही तांत्रिक त्रुटीमुळे सत्ता हातून निसटली. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निकराची लढत देत कॉंग्रेस पक्षाला दुसऱ्या स्थानावर नेऊन ठेवले. सतेज पाटील आणि संघर्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्या राजकारणाचा प्रवेशच मुळी संघर्षातून झाला आहे. वसामान्य जनता हे त्यांचे टॉनिक आहे. सत्ताप्रिय अनेक लोक आज पक्ष सोडून सत्ताधारी झाले आहेत. पण सतेज पाटील मात्र काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात पक्षाचे तारणहार म्हणून कार्य करत आहेत. समाजभान जपणारे नेतृत्वगुण त्यांच्याकडे आहेत. माणुसकीची भिंत, तरुणांसाठीचे रोजगार मेळावे, सतेज कृषी प्रदर्शन, गृहिणी महोत्सव, आर्ट फाउंडेशनद्वारे कला महोत्सव अशा विधायक उपक्रमांमुळे जनतेचा आश्वासक चेहरा म्हणून ते राज्यभर परिचित आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

- भरत रसाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT