कोल्हापूर

इचल : शिवसेना बैठक

CD

36932
इचलकरंजी ः शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना आमदार सुहास बाबर शेजारी धैर्यशील माने, रविंद्र माने, सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव आदी.

आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू
आमदार सुहास बाबर ; इचलकरंजीत शिवसेना कार्यकर्यांचा मेळावा

इचलकरंजी, ता. १२ ः आगामी लोकसभा निवडणूक अद्याप दूर असल्या तरी शिवसैनिकांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी एकनिष्ठ आणि तन-मन-धन अर्पण करून शिवसेना वाढीसाठी कार्यरत असलेल्या शिलेदारांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लवकरच मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार सुहास बाबर यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी आमदार बाबर यांची निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांनी प्रथमच या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा येथील `मातोश्री` मध्यवर्ती कार्यालयात घेतला. यावेळी त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणाबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, आमदार बाबर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलकरून संवाद साधत येथे सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. काही दिवसातच रविंद्र माने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख माने यांनी आमदार बाबर यांचा सत्कार केला. लोकसभा मतदारसंघ अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने आमदार बाबर यांनी मार्गदर्शन केले. विशेषतः मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेवर भर देत मतदारयादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, अरुण इंगवले, पुंडलिक जाधव, मुरलीधर जाधव, सरपंच संतोष भोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे, तालुका प्रमुख अजित सुतार, युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, नगराध्यक्ष अजित पाटील, महादेव गौड, जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, शिवाजी जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT