कोल्हापूर

गाव नकाशावरील शासकीय रस्ते, पाणंद खुली करा

CD

रस्ते, पाणंद खुली करा,
अन्यथा ६ मेपासून उपोषण
‘राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ’ची मागणी

कोल्हापूर, ता. १६ : जिल्ह्यातील गाव नकाशे व सर्वे नकाशांवर नोंद असलेले शासकीय रस्ते आणि पाणंदी अतिक्रमणमुक्त करून तत्काळ खुले करावेत, अशी मागणी ‘राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ’ने केली आहे. या मागण्यांसाठी ६ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेचे कृष्णात जाधव यांनी दिला.
ते म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी नकाशावर नोंद असलेले रस्ते प्रत्यक्षात अतिक्रमणामुळे बंद आहेत. प्रशासनाने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ते खुले करावेत, अतिक्रमणधारकांना सात दिवसांचा अल्टिमेटम देऊन त्यानंतर सक्तीची कारवाई करावी, अशीही मागणी केली. अतिक्रमण कायम ठेवल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच अशा धारकांची डिजिटल नाकेबंदी करून ‘फार्मर आयडी’ ब्लॉक करण्याची मागणी केली आहे. तसेच अतिक्रमणाला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णात पाटील, मारुती खाडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : फुलंब्रीत शॉर्टसर्किटमुळे मक्काचे पीक जळून खाक

"तन्वीनं जो अत्यंत गलिच्छ राडा घातला" बिग बॉस मराठीचा एपिसोड पाहिल्यावर माजी स्पर्धकाची नाराजी; "ती अहंकारी निघाली"

Narendra Modi: विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत महिलांनी धडा दिला; क्रेडिट घ्या, पण महिला आरक्षणाला पाठिंबा द्या; मोदींची मोठी ऑफर

SCROLL FOR NEXT