37055
इंचनाळ : कामत शेत रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण प्रारंभप्रसंगी उपस्थित ॲड. दिग्विजय कुराडे, जोतिराम केसरकर, अमृत पाटील, उत्तम कांबळे आदी.
------------------------------
इंचनाळला रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील कामत शेत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी आमदार सतेज पाटील यांच्या विकासनिधीतून १० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक ॲड. दिग्विजय कुराडे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. हा रस्ता बरीच वर्षे दुर्लक्षित होता. रस्त्याचे प्रथमच डांबरीकरण होत आहे. जोतिराम केसरकर व अमृत पाटील यांच्या हस्ते रस्ता कामाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी ॲड. कुराडे, सरपंच उत्तम कांबळे, उदय देसाई, बंडा देशपांडे, धनाजी पाटील, राजकुमार पाटील, सचिन पाटील, दीपक पाटील, उदय पाटील, मारुती नांगरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.