कोल्हापूर

गड- संक्षिप्त

CD

37136 अमोल तांबेकर

तांबेकरांच्या उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट
गडहिंग्लज ः भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमोल शिवाजी तांबेकर यांच्या ‘रोबोटिक मेडिसीन स्प्रेअर’ या अभिनव डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या संशोधनकार्यात तांबेकर यांचे विशेष योगदान आहे. त्यांना संस्थेचे पाठबळ मिळाले. या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठा उंचावली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे नवीन संशोधन व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून संस्था उंच शिखर गाठेल, असा विश्वास सचिव स्वाती कोरी यांनी व्यक्त केला.
.....................
कुंभारच्या ऑटोमेटिक प्रोजेक्टरला पेटंट
गडहिंग्लज ः भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी जीवन कुंभार हिने बनविलेल्या ऑटोमॅटिक लाईट ॲडजस्टिंग प्रोजेक्टर या उपकरणाला भारत सरकारचे डिझाईन पेटंट मिळाले. तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या वैष्णवीच्या या यशाचे कौतुक होत आहे. वैष्णवीने विकसित केलेल्या उपकरणाच्या डिझाईनला अधिकृत प्रमाणपत्र मिळाले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संशोधन व तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी प्रेरणा मिळेल, असे प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे म्हणाले.
...................
साधना प्रशालेत जोतिबा फुले जयंती
गडहिंग्लज ः येथील साधना प्रशालेत महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्राचार्य आय. पी. कुटिन्हो व शिक्षकांनी फुलेंच्या प्रतिमेचे पूजन केले. प्राचार्य कुटिन्हो यांनी फुलेंच्या कार्याचा आढावा घेतला. शिक्षकांनी फुलेंच्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ आणि सत्यशोधक समाज या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता आणि शिक्षणप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांनी फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT