महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचा आढावा
कोल्हापूर, ता. १३ : पावसाळ्याच्या पाश् र्वभूमीवर विद्युत पुरवठ्यामधील व्यत्यय टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीचा आढावा महावितरणच्या मुंबई मुख्य कार्यालयातील अभियंता अरविंद पवार यांनी घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सहा उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील सहा उपविभागीय कार्यालयांना पवार यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून काय तयारी सुरू आहे? वीज अपघातांचे प्रमाण स्पेसर बसविल्यानंतर किती आहे ? महावितरणच्या यंत्रणांचे देखभाल दुरुस्तीचे काम कसे सुरू आहे? अशी विचारणा पवार यांनी संबंधितांना केली. तसेच वीज अपघात टाळण्यासाठी वेळेवर यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करा, यंत्रसामग्रीसाठी निधी पाहिजे असल्यास त्याची मागणी करावी; अशा सूचना त्यांनी दिल्या. वीज ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा, असे आवाहन ही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.