कोल्हापूर

आजरा ः शेखरूचा वाढता वावर

CD

ajr141.jpg....

37324

आजरा परिसरात शेखरूचा वाढता वावर
दुर्मिळ प्राणी ः विणीचा हंगाम, सहज दर्शन

सकाळ वृत्तसेवा

आजरा, ता. १४ ः शेखरू दुर्मिळ प्राणी मानला जातो. याला देवखार असेही संबोधले जाते. सह्याद्रीच्या दाट सदाहरित वनात याचे वास्तव्य आढळते. पूर्वी दाट जंगलात वावरणारी ही खार आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील जंगलालगतच्या शेतवडीत पाहावयास मिळत आहे. सध्या विणीचा हंगाम (मिलनकाळ) असून थोडासा लाजरा बुजरा असलेला शेखरू सहजतेने झाडावर बागडताना दिसत आहे. त्यामुळे याचे सहजपणे दर्शन होत आहे.
ही खारुताईपेक्षा आकाराने खुप मोठी असते. हिची शेपटीसह लांबी दोन ते तीन फूट असते. कान लहान आणि अंगावर दाट व मऊ फऱ असते. शेखरू हे शाकाहारी असून झाडाची फळे, फुले, कोवळी पाने व बिया हे प्रमुख खाद्य आहे. सध्या तालुक्यात काजू हंगाम जोरात आहे. त्यामुळे त्याचे काजूच्या झाडावर वावरतांना दिसत आहे. सध्या वसंतात अनेक वृक्षांना कोवळी पाने फुले व फळे येत बहरत असल्याने शेखरू खाद्याच्या शोधात झाडावर बागडत असतात; त्यामुळे दर्शन सुलभतेने होत आहे. शेखरूची पूर्वी चविष्ट मास व फर यासाठी त्याची मोठ्या प्रमाणात शिकार होत गेली. त्यामुळे या प्राण्याला राज्य प्राण्याचा दर्जा देऊन त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यात आले. सध्या पर्यावऱणप्रेमी व अभ्यासकांकडून जनजागृती सुरू आहे. शिकारीलाही प्रतिबंध होत असल्याने प्राण्याची संख्या या परिसरात वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पेरणोली तर नुकतेच शेखरुचे वझरे परिसरात दर्शन झाले होते. कोरीवडे (ता. आजरा) येथील शेतात हा प्राणी आढळला आहे. या प्राण्यांने शेतामधे घरटे केले असून त्याच्या विणीचा काळ असल्याने दररोजचे दर्शन घडत आहे.

चाैकट-
पर्यटक, पर्यावरणप्रेमींना संधी
शेखरू प्राणी दुर्मिळ आहे. त्यांच्या बागडण्याबरोबर व सुंदर दिसण्यावरून तो अनेकांना आकर्षित करतो. आंबोलीच्या जंगल परिसरात त्याचे दर्शन होत असल्याने पर्यटक परिसरात जात असत. सध्या तो आजरा तालुक्यातील जंगलालगतच्या अनेक गावात पहावयास मिळत आहे. पर्यटक, पर्यावरण प्रेंमींना त्याचे दर्शनाची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT