कोल्हापूर

गड- प्रभाग रचना हरकती

CD

हक्काच्या भाग बदलावर आक्षेप
ग्रामपंचायत निवडणूक ः प्रभाग रचना हरकतींची मंगळवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. १४ ः तालुक्यातील ५० ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली होती. त्यावरील हरकती व सूचना मांडण्याची मुदत संपली आहे. या प्रभाग रचनेवर सात हरकती दाखल झाल्या असून एका चंदनकूड गावातून तीन हरकतींचा त्यात समावेश आहे. दरम्यान, या हरकतींची सुनावणी मंगळवारी (ता. २१) प्रांताधिकारी यांच्यासमोर होणार आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील ८९ पैकी ५० ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते डिसेंबर या मुदतीत संपते. त्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. गुगल अर्थवरील नकाशे व लोकसंख्येनुसार प्रत्येक गावातील प्रभाग रचना निवडणूक यंत्रणेकडून पूर्ण करण्यात आली. ही प्रारूप प्रभाग रचना तयार करून तहसीलदारांनी ७ एप्रिलला प्रत्येक ग्रामपंचायत, चावडीवर प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती नोंदविण्याची मुदत १३ एप्रिलपर्यंत होती. मुदतीअखेर चंदनकूडमधून तीन तर कानडेवाडी, बसर्गे बुद्रुक, औरनाळ व बसर्गे बुद्रुक या गावांतून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली आहे. या हरकतींची सुनावणी २१ एप्रिल रोजी प्रांताधिकारी यांच्यासमोर होणार आहे. दाखल झालेल्या हरकतींमध्ये काही भाग एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचा आक्षेप नोंदविल्या आहेत. सर्वच हरकती अशाच प्रकारच्या आहेत. निवडणुकीसाठी संभाव्य इच्छुकांनी प्रभाग रचना पाहून अखेरच्या दिवशी या हरकती नोंदवल्याचे सांगण्यात आले. आपल्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेला भाग पूर्ववत मूळ प्रभागात समाविष्ट करण्याची मागणी हरकतीद्वारे करण्यात आले आहे. मुळात ही प्रभाग रचना लोकसंख्येनुसार केली आहे. निवडणूक जाहीर झालेल्यामध्ये सात, नऊ, अकरा, तेरा व पंधरा सदस्यीय ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सात ते अकरा सदस्यीय ग्रामपंचायतींमध्ये तीन, तेरा सदस्यांसाठी चार व पंधरा सदस्यांसाठी पाच प्रभाग केले आहेत. एकूण लोकसंख्येच्या समप्रमाणात ही प्रभाग रचना केल्याचे सांगण्यात येते.

चौकट...
* ४ मे रोजी अंतिम...
प्रांताधिकाऱ्यांनी हरकतींची सुनावणी झाल्यानंतर स्वतःचा अभिप्राय नोंदवून तो प्रस्ताव २३ एप्रिलला जिल्हाधिकाऱी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अभिप्राय तपासून २८ एप्रिलला निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवतील. त्यानंतर ४ मे रोजी निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देईल. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

SCROLL FOR NEXT