कोल्हापूर

आजरा ः हिंदु संमेलन कार्यक्रम

CD

ajr144.jpg....

37371

हिंदू म्हणून डोळसपणे
जगावे लागेल ः बाळ महाराज

आजऱ्यात हिंदू संमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

आजरा, ता. १४ ः ‘‘हिंदू म्हणून आपल्याला अधिक डोळसपणे जगावे लागेल. यापूर्वी फार विश्वासाने समोरच्यावर विसंबून राहत होतो.  असे न करता पदोपदी सावधानता बाळगावी लागेल,’’ असे प्रतिपादन योगी संतोष ऊर्फ बाळ महाराज इचलकरंजी यांनी केले.
येथील शिवतीर्था जवळ सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. श्री महंत सिद्धेश्वर स्वामीजी (गडहिंग्लज) रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगीरी महाराज (नूल, गडहिंग्लज), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक युवराज कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन झाले. त्यानंतर भारत माता आणि शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. हिंदुत्व व जयश्रीरामाचा जयघोष करण्यात आला. दरम्यान व्यंकटराव हायस्कूल ते संमेलनस्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील बालचमू, वारकरी सांप्रदाय, ब्रह्मकुमारीज यांचा लक्ष्मी-नारायण रथ, लेझीम पथक हे मुख्य आकर्षण होते.  दरम्यान सव्यसाची गुरूकुलम वेंगरुळ येथील कोदंडधारी युध्दकला प्रशिक्षण वर्ग यांच्यावतीने युध्दकलेचे प्रात्यक्षिक झाले. सिद्धेश्वर स्वामी  म्हणाले, ‘‘परकीय आक्रमणानंतरही भारत देश अभिमानाने उभा आहे. हिंदू समाज सहिष्णू आहे, परंतु स्वधर्माच्या रक्षणासाठी संघटित होणे काळाची गरज आहे. जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र यायला हवे.’’  युवराज कुलकर्णी यांनी रा. स्व. संघाचा इतिहास आणि संघाची कार्यपद्धती स्पष्ट केली. रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराजांनी  संत परंपरेचा आढावा घेतला. रमेश सुतार, ललित कांबळे, जांभळे गुरुजी, तानाजी बुरुड, नागराज रायकर यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना, तरुण मंडळे, ब्रह्माकुमारीचे भाई व बहेनजी तसेच, हिंदू बंधू-भगिनी उपस्थित होते. अभिषेक रोडगी यांनी आभार मानले. वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT