कोल्हापूर

बाबासाहेब आंबेडकर जयंती

CD

झेप अकॅडमी, गडहिंग्लज
ज्ञानदीप प्रबोधिनीच्या झेप अकॅडमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. डॉ. आंबेडकर व थोर विचारवंतांच्या प्रेरणेतून आजच्या पिढीची जडणघडण झाली पाहिजे, तरच उद्याचे भविष्य उज्ज्वल असेल असे मत संस्थापक एम. एल. चौगुले यांनी व्यक्त केले. चौगुले यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी स्वागत केले. ऊर्मिला कांबळे हिने मनोगत व्यक्त केले.
................
कोलेकर महाविद्यालय
नेसरी : येथील भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालयात डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यरांच्या हस्ते झाले. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय मुसाई अध्यक्षस्थानी होते. डाॅ. बी. आर. दिवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डाॅ. डी. के. कांबळे यांनी डाॅ. आंबेडकरांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती विशद केली. यावेळी डाॅ. एम. एस. कोळसेकर, डाॅ. अरुण कुंभार, मोहन शिंदे, अशोक पांडव आदी उपस्थित होते. प्रा. काजल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तेजस्विनी नाईक यांनी आभार मानले.
.....................
व्यंकटराव शिक्षण संकुल
आजरा ः येथील व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा पटेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. डी. आर. पाटील यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहीती दिली. संस्थेचे संचालक पांडुरंग जाधव, सचिन शिंपी, सुधीर जाधव, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, एम. ए. पाटील, प्रभारी प्राचार्य पन्हाळकर आदींसह शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
....................
जयभीम तरुण मंडळ
आजरा येथील जयभीम तरुण मंडळाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व बाैद्ध वंदना करण्यात आली. यावेळी डाॅ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोक चराटी, नगरसेवक परशुराम बामणे, नगरसेविका डाॅ. स्मिता कुंभार, असावरी खेडेकर, नगरसेवक निसार लाडजी, डाॅ. इंद्रजित देसाई, अभियंता विजयकुमार पाटील, सिद्धेश नाईक, आदीं उपस्थित होते.
...............
देवर्डे विद्या मंदिर, रवळनाथ हायस्कूल
देवर्डे (ता. आजरा) येथील विद्या मंदिर व रवळनाथ हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी सावंत होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सोहम आमले, अनुष्का तानवडे या विद्यार्थांची भाषणे झाली. यावेळी देवेंद्र शिखरे, राजेंद्र पाटील, शिवाजी सावंत आदी उपस्थित होते
................
पंडित दीनदयाळ विद्यालय
आजऱ्यातील पंडित दीनदयाळ विद्यालयात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली. मुख्याध्यापक संजीव देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांना दिलेला संदेश आजही प्रभावशील ठरतो आहे. यश संपादन करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि स्वाभिमान या मूल्यांचा स्वीकार करावा.’ यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.................
आजरा हायस्कूल
आजरा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापिका एच. एस. कामत यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी डाॅ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. एम. एस. कांबळे म्हणाल्या, ‘डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ते केवळ समाज सुधारक आणि राजकारणी नव्हते तर ते एक निष्णात कायदे पंडित व दूरदृष्टीचे नेते होते.’ यावेळी एस. जी. नाईक, भाग्यश्री पाटील, संजीवनी कुराडे, माधवी शेलार आदी उपस्थित होते. विद्या हरेर यांनी सूत्रसंचालन केले.
................
उत्तूर मिलिंदनगर
उत्तूर ः येथील मिलिंदनगरमध्ये आंबेडकर जयंती साजरी झाली. उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल हुले यांनी स्वागत केले. वसंतराव धुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. पंचायत समिती सदस्य विकास चोथे व सरपंच किरण आमणगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपसरपंच सुनीता हतीरगे, विठ्ठल उत्तूरकर, विजय हेगडे, गिरीश ऐवाळे, समीर हेगडे आदी उपस्थित होते. रूपाली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संतोष हेगडे यांनी आभार मानले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT