कोल्हापूर

सर्वसामान्यांचा विश्वास सार्थ ठरवा

CD

37545
रामपूर : येथे झालेल्या नूतन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ. शेजारी राजेश पाटील व इतर.
.................
सर्वसामान्यांचा विश्वास सार्थ ठरवा

मंत्री मुश्रीफ ः रामपूरमध्ये नूतन जि.प., पं.स. सदस्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १५ : ‘सर्वसामान्यांनी मोठ्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिलेले आहे. त्यामुळे प्रतिनिधींनी तो विश्वास सार्थ ठरवावा. जिल्हा परिषद व जिल्हा नियोजनातून चंदगडला निधी कमी पडू देणार नाही, मी हिमालयासारखा तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
रामपूर (ता. चंदगड) येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.
राजेंद्र शिवणगेकर यांनी प्रास्ताविक केले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘विकासकामे सातत्याने सुरू राहतील. मात्र, शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनतेत मिसळण्याचे काम सदस्यांनी करावे. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील ११ पैकी ९ जिल्हा परिषद जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. ही जनतेची क्रांती असून, आम्ही ती विसरणार नाही.’ सभापती विलास नाईक यांनी रिक्त पदे तत्काळ भरून विकासाला गती देण्याची मागणी केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘नूतन सदस्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन ते प्रामाणिकपणे सोडवावेत. विद्यमान आमदारांकडून दीड वर्षात ठोस काम झाले नाही. केवळ आश्वासनांची खैरात सुरू आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे चंदगडचा निसर्ग धोक्यात येईल.’
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विद्या पाटील, संग्रामसिंह कुपेकर, सुधीर देसाई, अमर चव्हाण, प्रतिभा चव्हाण, सुखदेव शहापूरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT