कोल्हापूर

सकाळ स्वरसेवा मैफल

CD

फोटो- कालच्या बातमीतून
............

भवानी मंडपात आज रंगणार ‘स्वरसेवा’
मैफलीला मोफत प्रवेश : प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी व विराज यांचा स्वराभिषेक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘स्वरसेवा’ या मैफलीची उत्सुकता शिगेला पोचली आहे. ही मैफल शुक्रवारी (ता. १७) कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे. मैफलीसाठी सर्वांना मोफत प्रवेश असून ऐतिहासिक भवानी मंडपात सायंकाळी सहाला ही मैफल होणार आहे. चितळे डेअरी या मैफलीचे मुख्य प्रायोजक आहेत. श्री छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
दरम्यान, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मैफलीला प्रारंभ होईल. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू, किराणा घराण्याचे प्रसिद्ध युवा गायक विराज जोशी हे वडील श्रीनिवास जोशी यांच्यासमवेत ही मैफल सजवणार आहेत.
आदिशक्ती, आदिमायेची स्तुती ही शक्ती, ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील विविध ठिकाणचा देवीचा महिमा या मैफलीतून अनुभवायला मिळणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी मंदिराच्या साक्षीने पहिल्यांदाच ही अनोखी मैफल रंगणार आहे. मैफलीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले आहे.
--
एक वेगळी आनंदानुभूती...
देशातील विविध प्रांतांत देवीच्या स्तुतीसाठीची गीतं, प्रार्थना, आरती असो किंवा स्तोत्र यामध्येही विविधता असून, त्याचा सांगितिक थाटही वेगवेगळाच आहे. या साऱ्या गोष्टींचा सुरेख मिलाफ ‘स्वरसेवा’ मैफलीतून घडणार आहे. पं. भीमसेन जोशी यांच्याही काही लोकप्रिय रचना मैफलीत असतील. अर्थात त्यासाठी भव्य वाद्यवृंदही सोबतीला असणार आहे. विराज व श्रीनिवास जोशी यांच्या संकल्पनेतून सजणारी ही मैफल एक वेगळी आनंदानुभूती देणार आहे. चला, तर मग ऐतिहासिक भवानी मंडपात. एका अविस्मरणीय मैफलीचे साक्षीदार होऊया.
...
० दृष्टिक्षेपात ‘स्वरसेवा’ मैफल
० कुठे - ऐतिहासिक भवानी मंडप
० कधी - शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजता
० मैफलीसाठी सर्वांना मोफत प्रवेश असेल. मात्र, आसनक्षमता मर्यादित असल्याने प्रवेश अग्रक्रमानुसार दिला जाणार आहे.
० अधिक माहितीसाठी संपर्क ः ९१३०४४६५६६, ९५५२५८१९१८
...
चौकट
‘सकाळ’ वाचक वर्गणीदारांसाठी...
‘सकाळ’च्या वाचक वर्गणीदार योजनेंतर्गत ही मैफल होत असून, शास्त्रीय गायनासह भक्ती संगीताचा अनोखा मिलाफ यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. या मैफलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवीन योजनेत सहभागी होण्यासाठी अजूनही संधी असून, नोंदणी झाली नसेल तर कार्यक्रमाच्या ठिकाणी नवीन वर्गणीदार योजनेत सहभागी होता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT