कोल्हापूर

गड- संक्षिप्त

CD

37706
सुमित पाटोळे, आदित्य आंबी, अक्षरा पाटील, दीक्षा घागरे

साई इंटरनॅशनलचा १०० टक्के निकाल
गडहिंग्लज ः येथील साई सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. या शाळेचा विद्यार्थी सुमित पाटोळे याने ९७.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य आंबीने ९३.४० टक्के, अक्षरा पाटील व दीक्षा घागरे यांनी अनुक्रमे ९० टक्के गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक मिळविला. याशिवाय पीयूष घुगरे ८९.६०, आदिती घोरपडे ८८.२० टक्के गुण मिळवून चतुर्थ व पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पाटोळेने इंग्रजी व मराठीत, आंबीने मराठी विषयात १०० गुण मिळविले. संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, विश्वस्त तुषार पाटील, प्राचार्या सुजाता नागराळे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
-----------------------------------------
शिष्यवृत्ती सराव परीक्षा शांततेत
गडहिंग्लज ः येथील किलबिल विद्या मंदिरात राजे फाउंडेशन व पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे चौथी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. प्रीतम कापसे, सुनील गुरव, अनिल खोत, सचिन घुगरी, अझहर बोजगर, संदीप कुरळे, सूरज धबाले यांच्याहस्ते परीक्षेला प्रारंभ झाला. राहुल शेट्टी यांनी परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. संस्थाध्यक्षा अंजली हत्ती, सचिव डॉ. सरस्वती क्षीरसागर, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे आदींसह शिक्षकांनी नियोजन केले.
-------------------------------------
शमनजी ग्रुपच्या १२ विद्यार्थ्यांची निवड
गडहिंग्लज ः बहिरेवाडी (ता. आजरा) येथील रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची कृषी व कृषी संलग्न पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली. राहुरी कृषी विद्यापीठात सहा, मराठवाडा कृषी विद्यापीठात चार व कोकण कृषी विद्यापीठात दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये प्रथमेश मगदूम, पूजा मोर्ती, सुहाना जामदार, सानिका जाधव, पायल पोवार, अभिषेक बसरगाव, पल्लवी पाटील, स्वरूपा साळुंखे, आरती गेजगे, स्नेहल कदम, तेजस्विनी लोहार, साक्षी लाड यांचा समावेश आहे. संस्थाध्यक्ष डॉ. रियाज शमनजी, सचिव लक्ष्मण कंग्राळकर, सचिव सुलोचना रेडेकर, रजिस्ट्रार शफी अहमद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
----------------------------------------------
हाळलक्ष्मी देवीची मंगळवारी यात्रा
गडहिंग्लज ः शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडरगे रोडवरील ग्रामदैवत श्री हाळलक्ष्मी देवीची यात्रा मंगळवारी (ता. २१) होत आहे. हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व गणेश मंडळाने यात्रेचे नियोजन केले आहे. अक्षय तृतीयेच्या पहिल्या मंगळवारी देवीची यात्रा करण्याची परंपरा आहे. सोमवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता यशवंत पाटील-खातेदार यांच्या वाड्यातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ होईल. यात्रेदिवशी मंगळवारी पहाटे पाच वाजता अभिषेक व पूजा होईल. सेवेकरी कुंभार समाजातर्फे पूजा बांधण्यात येणार आहे. अकरा वाजता पनोरे व बागी समाजाचा मानाचा नैवेद्य व आरती झाल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होईल. दुपारी चार वाजता वडरगेच्या गोसावीनाथांच्या पालखीची भेट होऊन दोन्ही पालख्या मंदिरात विराजमान होतील. यात्रेसाठी हाळलक्ष्मी वाचनालय, महिला बचत गटाचे पदाधिकारी, नागरिक, भाविक, मानकरी यात्रेच्या नियोजनात आहेत.
-----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT