कोल्हापूर

आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर

CD

डोळ्यावर राजकीय पट्टी बांधलेल्या
व्यक्तींना विकास कसा दिसणार?

अजित पवार गटाचा आमदार शिवाजी पाटील यांच्यावर पलटवार

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ ः माजी आमदार राजेश पाटील यांनी केलेला विकास डोळ्यावर राजकीय पट्टी बांधलेल्या व्यक्तींना कसा दिसणार, त्यासाठी तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर जा. तिथली कामे पाहा, मग जनताच तुम्हाला उत्तर देईल, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिटणीस राजीव जाधव यांनी पत्रकातून दिले आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी १६०० कोटीच्या विकासकामांचा माजी आमदारांनी जनतेला हिशेब द्यावा, अशी टीका केली होती. त्याला आज राजेश पाटील गटाकडून हे प्रत्युत्तर देण्यात आले.
पत्रकात म्हटले आहे की, १६०० कोटीच्या कामांचा हिशेब दिल्यास तुम्ही काय प्रायश्चित घेणार हे जाहीर करावे. राजेश पाटील यांच्या पराभवाबाबत त्यांना अभ्यासू विद्यार्थी काही कारणामुळे परीक्षेत अपयशी ठरल्याचे, तर शिवाजी पाटील वर्षभर पुस्तक न उघडता कॉपी करून उत्तीर्ण झाल्याचे म्हटले आहे. सांप्रदायिक लाटेवर स्वार होऊन आणि निवडणुकीतील साधनसामग्री वापरून मिळवलेला अपघाती विजय फारसा मिरवायचा नसतो. शक्तिपीठ महामार्गाला जनतेचा असलेला विरोध नजरेआड का करता, शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या आणि त्यांचे जीवन उद्‍ध्वस्त करणाऱ्या या महामार्गापेक्षा एखादे रचनात्मक काम हाती घ्या. मंत्री मुश्रीफ यांनी चंदगड तालुक्याला काय दिले असे विचारण्यापूर्वी स्वतः अभ्यास करायला हवा होता. १६०० कोटींच्या निधीमध्ये ग्रामविकासमंत्री म्हणून मुश्रीफ यांनीही निधीत सिंहाचा वाटा उचलला आहे. राजेश पाटील यांच्यासारख्या निष्कलंक व्यक्तीवर केलेल्या आरोपांचा जाहीर निषेध करून यापुढे मंत्री मुश्रीफ किंवा राजेश पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्यास खणखणीत उत्तर देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT