कोल्हापूर

गड- सोमवारी कार्यशाळा

CD

गडहिंग्लजला सोमवारी कार्यशाळा
गडहिंग्लज ः भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्रीपतराव शिंदे एज्युकेशनल ग्रुपतर्फे तालुक्यातील महिला बचत गटांसाठी सोमवारी (ता. २०) ‘प्रॉडक्शन मार्केटिंग अँड ब्रँडिंग’ विषयावर कार्यशाळा होणार आहे. डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सावित्रीबाई फुले महिला सक्षमीकरण केंद्र, गडहिंग्लज पंचायत समिती व गडहिंग्लज नगरपरिषदेच्या सहकार्याने ही कार्यशाळा होईल. पालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी अकरा वाजता कार्यशाळा होणार आहे. मुंबईच्या सखी युनिकचे प्रशांत मांडके महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, विपणन आणि बाजारपेठेतील संधी यावर मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील सर्व महिला बचत गटांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा ऊर्मिला शिंदे यांनी केले आहे.
...................
गडहिंग्लजला उद्या शिव-बसव जयंती
गडहिंग्लज ः येथील संघर्ष ग्रुपच्या वतीने रविवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते मिरवणुकीचे उद्‍घाटन होईल. म. दुं. श्रेष्ठी विद्यालयापासून सायंकाळी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची २१ फुटी मूर्ती, हरियाणातील शिवतांडव व महाकाली नृत्य, ‘देवमाणूस’फेम अभिनेत्री अस्मिता देशमुख, बेळगावातील हत्ती व घोडे, विजापुरातील बाहुबली देखावा, कलशधारी महिला, चंदगडच्या वारकरी महिला, लेझीम पथक, पारंपरिक वाद्याच्या गजरात ही मिरवणूक निघणार आहे. संघर्ष ग्रुपचे शिवराज पाटील, नगरसेवक गुंड्या पाटील, अध्यक्ष अशोक कुरबेट्टी व कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

IPL 2026 News: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर CSK च्या ताफ्यात! काल वानखेडेवर होता, आज मोठा ट्विस्ट; रोहितचा आशीर्वाद घेतला अन्...

Latest Marathi News Live Update : इंडिया आघाडीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला: अमित शहा

Lucky Plants for Home : कुंडीत लावा 'ही' 2 युनिक झाडे! घराकडे खेचतात पैसा; उघडतात यशाची दारे, पण रोपटं लावताना करू नका एक चूक

SCROLL FOR NEXT