कोल्हापूर

महाऊर्जा महाव्यवस्थापकांना निवेदन

CD

सौरऊर्जा पंप जोडणीबाबत
बैठक घ्या ः गड्ड्यान्नावर

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १७ ः चंदगड, आजरा व गडहिंग्लज विभागातील सौरऊर्जा वीजपंप जोडणीसंदर्भात व त्या अनुषंगाने विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी केली. पुणे येथे महाराष्ट्र ऊर्जा विभागाचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश बखौरिया यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करून निवेदन दिले.
शेतकऱ्यांनी सौरर्जा वीजपंप जोडणीसाठी अर्ज देऊन तसेच त्याला मंजुरी मिळून दीड-दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप जोडणी मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी असून, त्यांचे नुकसान होत आहे. याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर किती दिवसांत जोडणी दिली जाते, सौरपंप जोडणाऱ्या मान्यताप्राप्त एजन्सी कोणत्या आहेत, वीज पंप बसविल्यानंतर देखभाल दुरुस्तीची एजन्सीची जबाबदारी किती दिवसांची आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे. ज्यांना जोडण्या दिल्या आहेत, त्यांच्या दुरुस्तीबाबत संबंधित एजन्सीकडे विचारणा केली असता दाद दिली जात नाही. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक झाल्यानंतर शंकांचे निरसन होईल. राज्यातील वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी संघटनेचे गौरव इंगळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT